सेन्सेक्स, निफ्टीत वाढ ! निफ्टी ट्रेडिंग २२२९८.५० वर सेन्सेक्स ७३२५७.६८ पातळीवर
भारतीय इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज सकारात्मकता, मिडिया निर्देशांकात वाढला, गॅस समभाग मात्र घसरले
मुंबई: भारतीय इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज सकारात्मकता पहायला मिळाली आहे. सेन्सेक्स निफ्टीत वाढ आजही कायम आहे. काल अखेरच्या सत्रात निफ्टी सेन्सेक्स वाढल्याचे दिसून आले होते. आज सेन्सेक्स सकाळ सत्र सुरू झाल्यानंतर ९९.४४ अंशाने वाढत ७३२५७.६८ पातळीवर पोहोचला होता. निफ्टी १८.३० अंशांने वाढत २२२३५.७५ पातळीवर पोहोचला. बँक निफ्टी सकाळी बाजार सुरू झाल्यावर ०.४१ टक्क्याने वाढत ४७११२.१० पातळीवर पोहोचला आहे.
झी एंटरटेनमेंटचे सेबीच्या चौकशीचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतरही आज झीचा समभाग ५ टक्क्याने वाढत १७६.७० प्रति समभाग (शेअर) पर्यंत पोहोचला आहे. शेअर बाजार तज्ञांच्या मते गुंतवणूकीसाठी आज योग्य प्रतिक्षा करत गुंतवणूकदारांनी विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. निफ्टीवर तेल गॅस समभाग वगळता बाकी सेक्टर समभाग निर्देशांक 'बुल ' राहिले. निफ्टी रिअल्टी समभाग १.५५ टक्क्याने वाढ ९२३.७५ पातळीवर पोहोचला.
सकाळच्या सत्रात युएस डॉलर तुलनेत भारतीय रुपयात कुठलीही घसरण किंवा भाववाढ झाली नाही. यामुळे गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित होत आज बाजार वाढेल या आशा पल्लवित झाल्या आहेत. सकाळी ११ च्या सुमारास निफ्टी ५० हा १९.५० अंशाने वाढत २२३६.९५ पातळीवर पोहोचला होता. निफ्टी मिडकॅप ०.७९ टक्क्याने म्हणजेच ८६.५० अंशाने वाढत ११०६६.६० पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी बँक निर्देशांक ११ च्या सुमारास ४६९७३.२० पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी फायनान्स सेवा निर्देशांक ४१.०५ ( ०.२० %) वाढत २०७०६.९५ पातळीवर पोहोचला. निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक सुद्धा ०.३८% वाढत ७५३१.४५ पातळीवर पोहोचला आहे.
निफ्टी चे पीएसयु बँक, एफएमसीजी, तेल गॅस वगळता सर्वच्या सर्व निर्देशांक ' हिरवे ' पहायला मिळाले आहेत. निफ्टीत मिडिया समभागात देखील मोठी वाढ झाली आहे. सकाळी ११ पर्यंत सर्वाधिक निफ्टी निर्देशांक २२२९८.५० पातळीवर पोहोचली होती. निफ्टीतील एकूण ३२ समभागाचे मूल्य वधारले असून १८ कंपन्यांचे समभाग नाकारले गेले आहेत. निफ्टीवर डॉ रेड्डीज, सिप्ला, विप्रो , एचडीएफसी बँक समभागात वाढ झाली तरी दुसरीकडे भारती एअरटेल, एशियन पेटंस , बीपीसीएल, एनटीपीसी, पॉवर ग्रीड या समभागात घसरण झाली. विशेषत शेअर बाजारातील कंपन्यांचे आज मार्केट कॅपिटलायझेशन ३८८.८० लाख कोटींवर पोहोचले आहे.
बीएसीत बँक निर्देशांक ७७.०३ अंशाने वाढत ५३, ४२८.३१ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स ११ च्या सुमारास ६६ अंशाने वाढत ७३२२४.०५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स ५० देखील २२.५३ अंशाने वाढत २३३२३.०३ पातळीवर पोहोचला आहे. सकाळच्या सत्रात सर्वाधिक सेन्सेक्स निर्देशांक ७३४०५. ३२ पातळीवर पोहोचला आहे.
सेन्सेक्सवर विप्रो, टायटन, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह या समभागातील मूल्य वधारले दुसरीकडे मात्र पॉवर ग्रीड, एनटीपीसी, जेएसडब्लू स्टील, भारती एअरटेल या समभागात घट झाली आहे. जपान , युएस, युरोप शेअर बाजारातील चढता आलेख भारतीय शेअर बाजारात कायम राहिला आहे