भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांचे काँग्रेसवर गंभीर आरोप
23-Feb-2024
Total Views |
नवी दिल्ली : "मी सहा-सात वर्षांपूर्वी सांगितले होते. तेच आज जीशान सिद्दीकी सांगत आहेत. काँग्रेस हा सर्वात मोठा मुस्लिम विरोधी पक्ष आहे. काँग्रेस पक्ष मतपेढीच्या राजकरणासाठी आणि तुष्टीकरणासाठी ते अल्पसंख्यांकांसोबत असल्याचा आव आणत असले तरी प्रत्यक्षात यातून अल्पसंख्याकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे." असे वक्तव्य भाजप प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी केले आहे.
काँग्रेसने बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जीशान सिद्दीकी यांना मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवले आहे. पदावरुन हटवल्यानंतर जीशान सिद्दीकी यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. राहुल गांधींनी भेटण्यासाठी त्यांना दहा किलो वजन कमी करण्यास सांगण्यात आले होते. असा दावा त्यांनी केला होता.
जीशान सिद्दीकी यांच्या आरोपानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेते शेहजाद पूनावाला म्हणाले की, "काँग्रेस मतपेढी आणि तुष्टीकरणासाठी अल्पसंख्याकांसोबत आहे, असे भासवत असली तरी प्रत्यक्षात अल्पसंख्याकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे."
पुढे बोलताना भाजप नेते म्हणाले की, "आज जीशान सिद्दीकी स्वतः काँग्रेसच्या द्वेषाचा सामना करत आहेत. काँग्रेसने एकामागून एक दंगली होऊ दिल्याचे आपण पाहिले आहे. मुंबई दंगलीला उद्धव सेना जबाबदार आहे, असे काँग्रेस पक्ष म्हणायचा, पण काँग्रेस मुस्लिमांचा द्वेष करत असल्याने आज त्यांनी युती केली आहे."