लई भारी! ईपीएफओने आपल्या सदस्यांत मोठी वाढ केली

ईपीएफओतील सदस्यतेत महाराष्ट्रात भरघोस वाढ

    21-Feb-2024
Total Views |

EPFO
 
मुंबई: ईपीएफओने डिसेंबर महिन्यात तब्बल १५.६२ लाख नवीन सदस्य बनवले आहेत. ईपीएफओ (कर्मचारी भविष्य निर्वाहनिधीच्या) अधिकृत पेरोल आकडेवारीनुसार ही विक्रमी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. डिसेंबरमध्ये झालेली सदस्य वाढ त्या आधीच्या तिमाहीतील सर्वाधिक वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात ११.९७ टक्के सदस्यत्वात वाढ झाली आहे.
 
आर्थिक वर्ष २३च्या तुलनेत डिसेंबर २२ मध्ये ही दरवाढ ४.६२ टक्के इतकी वाढली होती. या माहितीच्या आधारे वाढलेला विकासदर, वाढलेली उत्पादकता व वाढलेल्या नोकरीच्या संधी याचा परिणाम म्हणून सदस्यत्व वाढल्याचे म्हटले जात आहे.
या माहितीनुसार, १८ ते २५ वयोगटातील तरूणांच्या सदस्यत्वात ५७.१८ टक्क्यानी नोंदणीत वाढ झाली आहे. यामुळे प्रथमतः नोकरी करणाऱ्या तरूणांची संख्या वाढली आहे.
 
माहितीतील आकडेवारीनुसार, १२.०२ लाख लोकांनी ईपीएफओ सोडून पुन्हा ईपीएफओत परतले आहेत. मुख्यतः या व्यक्तींनी नोकरी सोडत पुन्हा ईपीएफओच्या कार्यकक्षेत येणाऱ्या ठिकाणी पुन्हा आपल्या नोकरीची सुरूवात केली आहे.
 
लिंग गुणोत्तर चाचणीत ८.४१ लाख नवीन सदस्यांपैकी २.०९ लाख सदस्या महिला आहेत. मागील डिसेंबर २२ मधील ७.५७ टक्क्यांच्या तुलनेत या डिसेंबरमध्ये २.९० लाखांनी महिला सदस्यसंख्येत वाढ झाली आहे. नोव्हेंबर २३ च्या तुलनेत ३.५४ टक्क्याने डिसेंबरमध्ये महिला सदस्यता वाढली आहे.
 
पेरोल आकडेवारीनुसार, सर्वात जास्त सदस्यसंख्या महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, हरियाणा राज्यात वाढली आहे. इंडस्ट्रीज (स्टील आयर्न), बांधकाम, विमा या क्षेत्रातील वाढ सर्वाधिक आहे.