मुंबई: अखेर भारत व इंग्लंडमध्ये होणार असलेल्या फ्री ट्रेड अॅग्रीमेंट (एफटीए) औद्योगिक कराराबाबत चर्चा करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ इंग्लंडला निघाले असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. याआधी अनेक मुद्यांवर चर्चा झाली असून एफटीए मधील अनेक मुद्यांवर दोन्ही राष्ट्रांनी सहमती दर्शवली होती. काही मुद्यांवर मात्र अडसर राहिला होता. गुड्स, सर्विसेस, रूल ऑफ ओरिजन या मुद्यावरून स्पष्टता मिळवण्यासाठी भारतीय उच्चपदस्थ अधिकारी इंग्लंड दौऱ्यावर निघाले आहेत.
मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी घडलेल्या चर्चासत्रांचा आढावा घेतला होता. वृत्तसंस्थांना सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहिलेल्या मुद्यांवर सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी ही बैठक होणार आहे.
जानेवारी २०२२ मध्ये या करारासाठी चर्चा सुरू झाली होती. आतापर्यंत फ्री ट्रेड अॅग्रीमेंट चर्चेसाठी १३ फेऱ्या व मागील आठवड्यात एक फेरी अशा एकूण चर्चच्या १४ फेऱ्या झाल्या आहेत. एकीकडे भारतीय औद्योगिक विश्वातील इंग्लंडमध्ये अधिक वावर अपेक्षित करत असून प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान, हेल्थकेअर या क्षेत्रात भारताची अपेक्षा वाढली आहे. इंग्लड भारताकडून आयात निर्यातीवरील कस्टम ड्युटी माफ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांत भारत व इंग्लंडमध्ये आर्थिक संबंधात चांगली सुधारणा झाली आहे. दोन्ही देशांतील व्यापार हा आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये सुमारे २०.३६ अब्ज डॉलरने वाढला आहे.