शेअर बाजार: मार्केटची सुरूवात उत्साहवर्धक गिफ्ट निफ्टी २१९९७ वर
बीएससी सेन्सेक्स ७२०६१.७०, निफ्टी २१९०६.५० वर
मुंबई: आज बेंचमार्क इंडायसेस बीएसी सेन्सेक्स व एनएससीवर थोडी वाढ झाली असून आज मार्केट थोड्या प्रमाणात सकारात्मक दिसले. गिफ्ट निफ्टी ०.३७ टक्क्यांवर जात २१९९७ पर्यंत पोहोचले आहे. भारतीय रुपयात ३ पैशाची वाढ झाली असल्याचे मार्केट सेंटिमेंट सकारात्मक दिसली. आज सुपीम कोर्टाच्या ५ न्यायाधीशांचा खंडपीठाने राजकीय पक्षांच्या इलेक्ट्रोल बाँड स्कीम वर निकाल देत त्याला ' असंवैधानिक' घोषित केले आहे. एसबीआयला देखील राजकीय करता बाँड वाटपास सरकारने मनाई केली आहे.
तसेच रिझर्व्ह बँकेने विसा व मास्टरकार्ड या पेमेंट कंपन्यांना सेवा पुरवण्यात येणाऱ्या कंपन्याना व्यवसायिक पेमेंट स्विकारण्यासाठी आवाहन केले आहे. या घटनांचा कदाचित प्रभाव आजच्या क्लोजिंग बेलनंतर दिसू शकतो असा तज्ज्ञांचा कयास आहे.
आज सेन्सेक्स २३८.८४ ने वाढून ( ०.३३%) ७२०६१.७० ला उघडले गेले. व निफ्टी ६६.५० ने वाढत सकाळच्या सत्रात २१९०६.५० पर्यंत पोहोचले होते. बँक निफ्टी १८.८० टक्क्याने वाढत (०.२६ %) ४६०२७.१० पर्यंत पोहोचला आहे. निफ्टी ५० मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, ओएनजीसी, पॉवर ग्रीप कॉर्पोरेशन, बीपीसीएल कोल इंडिया हे शेअर्स तेजीत राहिले. एक्सिस बँक, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट, अपोलो हॉस्पिटल हे शेअर्स मात्र घसरले.