शेअर बाजारात काल तेजी आज पडझड

ओपनिंग बेलनंतर खुळखुळा. युएस फेडरलच्या अपेक्षेहून अधिक इन्फ्लेशन (महागाई) दरात वाढ

    14-Feb-2024
Total Views |

stock market 
 
 
 
शेअर बाजारात काल तेजी आज पडझड
 
 
ओपनिंग बेलनंतर खुळखुळा. युएस फेडरलच्या अपेक्षेहून अधिक इन्फ्लेशन (महागाई) दरात वाढ
 

मुंबई: काल क्लोजिंग बेलनंतर निफ्टी सेन्सेक्स वाढल्याचे चित्र दिसून आले होते. मात्र आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ५०० पूर्णांकांने व निफ्टी १५० पूर्णांकांने घसरला आहे. बीएससी मिड कॅप स्मॉल कॅप देखील ०.७ ते १ टक्क्याने घसरल्याचे पाहिला मिळाले. विशेषतः आयशर मोटर्स, विप्रो, इन्फोसिस एलटीआय माईंड ट्री, इंडसइंड बँकचे शेअर घसरल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. बँक निफ्टी कालच्या पेक्षा घट होत १.७ टक्क्याने घसरत ४४९३८.६० वर पोहोचला आहे ‌. निफ्टी ५० वर बजाज ऑटो आयशर मोटर्स अदानी एंटरप्राईज, कोल इंडिया या शेअर्सला तेजी पहायला मिळाली.
 
दुसरीकडे एलटीआयमाईंड ट्री, विप्रो, सन फार्मा शेअर्स मध्ये पडझड झाली आहे. निफ्टी ५० , १६५.१० ने घसरले असून २१५७८.५० वर बीएससी ३० सेन्सेक्स ५१९.९४ टक्क्यांनी म्हणजेच ७१०३५.२५ ला सकाळी उघडला गेला. क्रुड तेलाच्या किमती ०.३३ टक्क्याने कमी झालेल्या पहायला मिळाल्या. निफ्टी मध्ये एशियन पेटंस भारती एअरटेल एचसीएल टेक्नॉलॉजी, एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर या शेअर्सच्या किंमतीत पडझड पहायला मिळाली.
 
युएस इन्फ्लेशन इंडेक्सचा रेट कटचा अंदाज वर्तवला जात असल्याने कालचा शेवटच्या सत्रात मार्केट वधारले होते. परंतु अपेक्षित प्रलंबित युएस इन्फ्लेशन दरात वाढ झाल्याने त्याची झळक शेअर बाजारावर पहायला मिळत आहे.