मोठी बातमी ! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

    14-Feb-2024
Total Views | 762
 gandhi congress
 
दिसपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलहाच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. काँग्रेस पक्षाला देशातील अनेक राज्यातून राजकीय धक्के बसत आहेत. तीन दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. तर आता आसाम काँग्रेसला सुद्धा मोठे खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
आसाम काँग्रेसच्या दोन आमदारांनी दि. १४ फेब्रुवारी बुधवारी काँग्रेसच्या संघटनात्मक पदांचा राजीनामा दिला आहे. या दोन आमदरांची नावे, बसंत दास आणि आमदार कमलाख्या डे पुरकायस्थ यांनी आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
 
आसाममधून काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा गेली होती. त्यांच्या या यात्रेला जाऊन काही दिवस उलटत नाहीत तेच, काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. भविष्यात आसाम काँग्रेसमध्ये आणखी मोठी फुट पडते का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121