पाकिस्तानचा दुटप्पीपणा उघड! भारताने सुनावले खडे बोल
07-Dec-2024
Total Views |
नवी दिल्ली : दहशतवादावर दुटप्पी भूमिका घेणाऱ्या पाकिस्तानला भारताने चांगलेच खडे बोल सुनावले आहे. शुक्रवार दिनांक ७ डिसेंबर रोजी भारताने पाकिस्तानला कुख्यात दहशतवादी मसूद अझहर याच्याविरोधात कारवाई करण्यास सांगितले आहे. बहवालपुर येथील एका सभेत अझहरने भाषण केल्याची बातमी नुकतीच समोर आली. याच पार्श्र्वभूमीवर पाकिस्तानच्या दु्प्पटी वागण्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल माध्यमांशी बोलताना म्हणाले " मसूद अझहर याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी भारताची मागणी आहे. अझहर हा पाकिस्तान मध्ये नसल्यातचे वृत्त आम्हाला कळवण्यात आले होते. परंतु आमच्या हाती आलेली माहिती जर का खरी असेल तर पाकिस्तानचा दुटप्पी व्यवहार यातून स्पष्ट होतो." २०१९च्या मे महिन्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून सूचीबद्ध केले होते आणि भारताने २०१९च्या सप्टेंबर महिन्यात त्याला दहाशतवादी घोषीत केले होते. २००१ साली भारताच्या संसदेवर अझहरने हल्ला केला होता. त्याच वर्षी, जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेच्या आवारात सुद्धा अझहरने हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये एकूण ३८ लोक मारले गेले होते. २०१६ मध्ये झालेला पठाणकोट मध्ये झालेला हल्ला असो किंवा बीएसएफच्या छावण्यांवर झालेला दहशतवादी हल्ला असो यामध्ये मसूद अझहरचा हात होता. १९९४ साली भारताने त्याला अटक केली होती परंतु १९९९ साली झालेल्या आयसी ८१४ हायजॅक नंतर त्याला प्रवाशांच्या बदल्यात सोडावे लागले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या म्हणण्यानुसार, जैश आणि त्यांचा म्होरक्या मसूद अझहर ओसामा बिन लादेनच्या अल-कायदा आणि तालिबानशी आर्थिक, नियोजन आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता.