मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Chhattisgarh Gharwapsi News) छत्तीसगडच्या सकती येथे तब्बल ६५१ ख्रिस्ती कुटुंबांनी घरवापसी केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ सनातन धर्मात प्रवेश केला आहे. हे कुटुंब सुरुवातीला हिंदूच होते, मात्र काही कारणास्वत ते धर्मांतरणास बळी पडले आणि त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. भाजप नेते प्रबल प्रताप सिंह जुदेव यांच्या नेतृत्वाखाली या कुटुंबांची घरवापसी झाली आहे.
प्रबल प्रताप सिंह जुदेव हे बागेश्वर धामचे आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या सानिध्यात काम करणारे व अखिल भारतीय घरवापसी संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांचे कुटुंब दोन पिढ्यांपासून या कार्यात गुंतले असून हजारो कुटुंबांना त्यांनी सनातनमध्ये परत आणले आहे. या कार्यक्रमात साध्वी प्रज्ञासह अनेक हिंदू संत सहभागी झाले होते.
यावेळी प्रबल प्रताप सिंह जुदेव म्हणाले, “सनातन संस्कृतीला सर्वात मोठा धोका छद्म हिंदूंपासून आहे. आपल्या हिंदू समाजात राहणारे हे क्रिप्टो ख्रिश्चन फसव्या पद्धतीने धर्मांतराला प्रोत्साहन देतात आणि स्लीपर सेलसारखे काम करतात. त्यांचा पर्दाफाश करणे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे.”