काँग्रेसच्या इंडिया आघाडीमध्ये फूट!

    02-Dec-2024
Total Views |

congresss

नवी दिल्ली : दिल्लीच्या संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू असताना, राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. अशातच आता संसदेतील मुद्दयांवरून इंडिया आघाडीमध्ये फूट पडताना दिसत आहे. संसदेच्या कार्यवाही आज सुरू होण्याआधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला तृणामूल काँग्रेसचे नेते मात्र गैरहजर राहिले. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
 
तृणमूलचे सरचिटणीस आणि नेते अभिषेक बॅनर्जी यांनी हिवाळी अधिवेशनात तृणमूल काँग्रेस बंगालच्या प्रश्नांना प्राधान्य देईल असे स्पष्ट केले होते. तत्पूर्वी, तृणमूलच्या ज्येष्ठ खासदार काकोली घोष दस्तीदार म्हणाल्या की पक्षाला संसद विस्कळीत होऊ द्यायची नाही. तृणमूलने यापूर्वी म्हटले होते की ते संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल आणि ईशान्य राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्राकडून तातडीच्या कारवाईची मागणी करेल. तत्तपूर्वी यामधून इंडिया आघाडीमध्ये फूट पडल्याची चर्चा केली जात आहे.