पक्षविरोधी काम, काँग्रेसचा कारवाईचा बाडगा!

    02-Dec-2024
Total Views |

kharge
 
नवी दिल्ली : पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर काँग्रेसने बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुकींमध्ये काँग्रेसला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या पदाधिकारे, कार्यकर्ते यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी २८ नोव्हेंबर रोजी पराभूत उमेदवारांची भेट घेतली. यावेळी या उमेदवारांच्या असंख्य तक्रारी खर्गे यांनी एकूण घेतल्या आहेत. यानंतर प्रदेश काँग्रेसकडून उमेदवारांच्या तक्ररींची दखल घेत नोटीस काढल्या जात आहेत. आत्तापर्यंत बंटी शेळके, सुरज ठाकूर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकी मध्ये पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांविरोधात काँग्रेसनं कारवाईचा बडगा उगारला होता. चंद्रपुरातील राजू झोडे, अभिलाषा गावतुरेंची काँग्रेसमधून हाकालपट्टी करण्यात आली होती.