काँग्रेससाठी थेट दुबईहून फतवा! हिंदूंनो विचार करून मतदान करा!
08-Nov-2024
Total Views | 164
मुंबई : ( Congress ) काँग्रेसला मतदान करण्याकरिता जारी करण्यात आलेल्या एका कथित फतव्याची प्रत काही महिन्यांपूर्वी प्रसारमाध्यमाने चव्हाट्यावर आणली होती. दुबई अमिराती मधील मुस्लीम संघटना आणि असोसिएशन ऑफ सुन्नी मुस्लिम संघटनेंकडून हा फतवा जारी करण्यात आला होता.
काँग्रेसला मतदान करण्याकरिता जारी करण्यात आलेल्या कथित फतव्यामध्ये विविध आमिषं देखील दाखवण्यात आली होती. परदेशातून हा मतदानाचा फतवा जारी करण्यात आल्याची माहिती तेव्हा समोर आली होती. काँग्रेस मुस्लीमांचा खरा मित्र असल्याचा उल्लेख या फतव्यात करण्यात आला होता. तसेच काँग्रेसला मतदान केल्यास संपूर्ण आर्थिक मदत केली जाईल, असे यात स्पष्ट करण्यात आले होते.
दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कळव्यातील एका जाहीरसभेत अश्या प्रकारच्या फतव्यांचा उल्लेख केला होता. या सभेत त्यांनी अश्याच फतव्यांचा उल्लेख करत काँग्रेस व उबाठा गटावर घणाघाती टीका केली होती.
या फतव्यामध्ये काँग्रेसला मदत करण्याचे थेट आवाहन करण्यात आल्यामुळे भाजपने यावर कडाडून टीका केली होती. मात्र काँग्रेसने भाजपकडे फक्त हिंदू- मुस्लीम हाच मुद्दा असल्याचा आरोप करत या सगळ्यावर पडदा टाकण्याच्या प्रयत्न केला होता.
फतव्यात नेमकं काय म्हटलं होतं ?
असोसिएशन ऑफ सुन्नी मुस्लिम (दुबई) ने ७ मे रोजी कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये होणाऱ्या भारतीय निवडणुकांमध्ये भाग घेणाऱ्या मुस्लिमांसाठी तिकीट बुकिंग आणि आधीच बुक केलेल्या तिकिटांची परतफेड यासह संपूर्ण आर्थिक मदत जाहीर केली आहे, ज्याचा उद्देश हुकूमशाही प्रवृत्तींना पराभूत करणे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला पुनर्स्थापित करणे आहे. मुस्लिमांचा खरा मित्र असलेला काँग्रेस पक्ष या निवडणुकांमध्ये सत्तेवर येईल, असा मजकूर कथित फतव्यामध्ये नमूद करण्यात आला होता.