टाटा समूहातील कंपनीच्या नफ्यात ४७ टक्के तर महसुलात ३९ टक्के वाढ; मात्र समभागात घसरण

    07-Nov-2024
Total Views |
tata group companies revenue growth


मुंबई :       टाटा समूहाची रिटेल कंपनी ट्रेंट लिमिटेडने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या नफ्यात ४७ टक्के तर महसुलात ३९ टक्के वाढ झाली आहे. बाजाराच्या अपेक्षेपेक्षा परिणाम कमकुवत असून समभागात मोठी घसरण झाली. शेअर दिवसभरात जवळपास ९ टक्क्यांनी घसरल्याचे पाहायला मिळाले. तथापि, यंदाच्या वर्षात समभागाने भागधारकांना सुमारे ११५ टक्के परतावा दिला आहे.


जुलै-सप्टेंबर २०२४ तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ४७ टक्क्यांनी वाढून ३३५ कोटी रुपयांवर पोहोचला असल्याचे ट्रेंट लिमिटेडने स्टॉक एक्सचेंजला सांगितले. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीने २२८ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल ३९.४ टक्क्यांनी वाढून ४१५७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग नफा(एबिटा) ४१ टक्क्यांनी वाढून ६४२ कोटी झाला आहे.

ट्रेंट स्टॉकमध्ये तीव्र घट झाली असून ट्रेडिंग सत्रादरम्यान स्टॉक ९ टक्क्यांहून अधिक घसरला. बीएसईवर दुपारच्या सत्रात २:३० वाजेपर्यंत शेअरने ७०४९.९५ चा उच्चांक व ६३१० चा नीचांक गाठला. बुधवारी मार्केट बंद होताना स्टॉक ६९५३ च्या पातळीवर बंद झाला. आज मार्केटमध्ये ट्रेंट लिमिटेड ६४९८ वर ६.५४ टक्क्यांनी घसरण झाली आहे.