सोने-चांदी दर आणखी स्वस्त?; खरेदीची उत्तम संधी, नवीनतम किंमती जाणून घ्या
07-Nov-2024
Total Views |
मुंबई : मौल्यवान वस्तूंवरील कस्टम ड्युटीतील कपातीस बराच अवधी उलटल्यानंतर आता आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने घसरण होताना दिसून येत आहे. आज सोने-चांदी भाव घसरणीसह उघडले असून सोन्याचे फ्युचर्सचे भाव सुमारे ७६,४५० रुपये, तर चांदीचे वायदे ९०,६०० रुपयांच्या आसपास व्यवहार करत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या आगामी भावात घसरण होत आहे.
त्यानंतर आता सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून २४ व २२ कॅरेट सोन्याचा भाव २०० रुपयांनी वाढला आहे. गुरुवारी ७ नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव ८० हजार ४०० रुपयांच्या आसपास आहे. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याचा दर ७३,७०० रुपयांच्या पातळीवर कायम आहे. तर दुसरीकडे चांदीचा दर प्रतिकिलो ९५ हजार ९०० रुपये आहे.
सोन्याच्या फ्युचर्सच्या किमती घसरणीने सुरू झाल्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंज(एमसीएक्स) वर सोन्याचा बेंचमार्क डिसेंबर करार २९० रुपयांच्या घसरणीसह ७६,३६५ रुपयांवर खुला झाला. हा करार १८८ रुपयांच्या घसरणीसह ७६,४६७ रुपयांच्या किमतीवर व्यवहार करत होता. यावेळी दिवसातील उच्चांक ७६,४६७ रुपये आणि दिवसाचा नीचांक ७६,३२२ रुपयांवर पोहोचला. सोन्याच्या फ्युचर्स किमतीने या वर्षातील सर्वोच्च पातळी ७९,७७५ रुपये गाठली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. कॉमेक्सवर सोने २,६६७.७० डॉलर प्रति औंसवर उघडले. तर चांदीचा भाव यावेळी दिवसातील उच्चांक ९०,६८६ रुपये व दिवसाचा नीचांक ९०,४३२ रुपयांवर पोहोचला. यावर्षी चांदीच्या भावाने १,००,०८१ रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती.