करदात्यांना मोठा दिलासा, 'सीबीडीटी'कडून व्याज माफीचे नियम शिथील!
05-Nov-2024
Total Views |
मुंबई : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ(सीबीडीटी)ने नवीन परिपत्रक जारी करत करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. सीबीडीटीने परिपत्रकाद्वारे व्याजाची मौद्रिक मर्यादा निर्दिष्ट केली असून कर अधिकाऱ्यांद्वारे माफ केली जाऊ शकते किंवा कमी केली जाण्याची शक्यता आहे. परिपत्रकानुसार, पीआरसीआयटी दर्जाचा अधिकारी दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त थकीत व्याज कमी करण्याचा किंवा माफ करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अर्थात सीबीडीटीने ४ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे, आयकर विभागाने कर अधिकाऱ्यांना विशिष्ट अटींच्या अधीन राहून करदात्याद्वारे देय व्याज माफ करण्याची किंवा कमी करण्याची परवानगी दिली आहे. प्राप्तिकर कायद्याच्या कलम २२० (२ए) अन्वये, जर करदात्याने डिमांड नोटिसमध्ये नमूद केलेल्या कराची रक्कम भरण्यात अयशस्वी झाल्यास विलंबाच्या कालावधीसाठी दरमहा एक टक्के दराने व्याज द्यावे लागेल.
कायदा प्रधान मुख्य आयुक्त किंवा मुख्य आयुक्त व प्रधान आयुक्त, आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना देय व्याजाची रक्कम कमी किंवा माफ करण्याचा अधिकार देतो. करदात्यांना दिलासादायक बातमी, सीबीडीटीने व्याज माफीचे नियम शिथिल केले आहेत. याचा फायदा ५० लाख ते १.५ कोटी रुपयांपर्यंतच्या थकबाकी व्याजासाठी, सीसीआयटी श्रेणीचा अधिकारी सूट/वजावटीचा निर्णय घेईल. तर ५ किंवा ५० लाखांपर्यंतच्या थकित व्याजावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.