शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा; सरकारी इ-मार्केट पोर्टलवर सिस्टम उपलब्ध होणार

    05-Nov-2024
Total Views |
central government e portal for farmers


नवी दिल्ली :        केंद्र सरकारने सरकारी इ-मार्केट(GeM) पोर्टलच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेती व बागकामासाठी दर्जेदार बियाण्यांच्या १७० श्रेणी विक्रीसाठी पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत. पोर्टलवर आता बियाण्यांची सुमारे ८ हजार वाणे उपलब्ध असून येणाऱ्या शेतकी हंगामात राज्य तसेच केंद्रसरकारी कंपन्यांना देशभरात पुढील वितरणासाठी उपयोगी पडावीत यादृष्टीने रचना केली आहे.
 

दरम्यान, सर्व राज्यांतील बियाणे महामंडळे व संशोधन संस्थांची मते विचारात घेऊन (GeM) पोर्टलवर या बियाण्यांच्या श्रेणी/प्रकारांचा समावेश केला आहे. भारत सरकारचे विद्यमान नियम तसेच मानकांप्रमाणे या बियाण्यांची मागणी नोंदवण्यासाठी पोर्टलवर तयार प्रणाली उपलब्ध आहे. यामुळे बियाण्यांची मागणी नोंदवण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे.

त्याचबरोबर, पोर्टलद्वारे बियाण्यांच्या मागण्या त्यांच्या श्रेणीबरहुकूम नोंदवल्या जाव्यात या सरकारच्या धोरणाला अनुसरून पोर्टलची रचना केली आहे. बियाण्यांच्या श्रेणी अथवा प्रकारानुरूप मागण्या नोंदवल्यामुळे निविदाप्रक्रिया जलद होणार असून सरकारी मागण्या नोंदवण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता व कार्यक्षमता येईल, त्याचबरोबर देशभरातील बियाणेविक्रेत्यांचा सहभाग वाढेल.तसेच बियाणे महामंडळे व राज्यसरकारी संस्थांनी दर्जेदार बियाणे किफायतशीर दरात मिळवण्यासाठी या श्रेणीबद्ध रचनेचा लाभ घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.