संजय वर्मा यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियूक्ती
05-Nov-2024
Total Views | 55
मुंबई : राज्याच्या पोलिस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या पदावर कोणाची नियूक्ती होणार? अशी चर्चा सुरु असताना आता संजय वर्मा यांची वर्णी लागली आहे.
रश्मी शुक्ला यांच्या बदलीनंतर या पदासाठी तीन नावांचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात येणार होता. यात विवेक फणसळकर, संजय वर्मा आणि रितेश कुमार या नावांचा समावेश होता. त्यानंतर आता संजय वर्मा यांच्यावर राज्याच्या पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संजय वर्मा यांच्यावर सध्या राज्याच्या कायदा आणि तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी आहे.