"मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत नाही तर..."; संजय राऊतांचं विधान

    22-Nov-2024
Total Views |
 
Raut
 
मुंबई : मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत नाही तर महाराष्ट्रातच होईल, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. विधानसभा निवडणूकीचे निकाल लागण्याआधीच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरु झाला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले आणि संजय राऊतांकडून मुख्यमंत्रीपदावर दावा सांगण्यात येत आहे.
 
संजय राऊत म्हणाले की, "महाविकास आघाडीच्या किमान १६० जागा निवडून येणार आहे. राज्यभरातील निवडणूका, मतदान, कौल यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मी जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि अनिल देसाई काल आम्ही सगळे एकत्र बसलो होतो. त्यानंतर आम्ही १६० जागा सहज जिंकू शकतो हे आमच्या लक्षात आले. मुख्यमंत्रीपदाबाबत अद्याप कोणताही फॉर्म्युला तयार करण्यात आला नाही. सगळे मिळून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवणार आहोत."
 
हे वाचलंत का? -  विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी मविआची खलबतं! संजय शिरसाटांचा खोचक टोला
 
"मुख्यमंत्रीपदाचा निर्णय महाराष्ट्रातच होईल. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना दिल्लीतून महाराष्ट्रात मँडेट घेऊनच यावे लागेल. शरद पवार मुंबईत असतात, उद्धव ठाकरेसुद्धा मुंबईतच आहेत. आम्ही कोणताही वेळ न घालवता निर्णय घेऊ. नाहीतर भाजपाचे लोक आमच्या हातातील ताट खेचायचा प्रयत्न करतील," असेही ते म्हणाले.