पतीच्या निधनाचं दुःख बाजूला सारत पत्नीने कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क
21-Nov-2024
Total Views |
गोंदिया : (Gondia) गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव भागात एका महिलेने पतीचा मृत्यू झाला असतानाही मतदानाचा हक्क बजावल्याची घटना समोर आली आहे. येथील रहिवासी शंकर ग्यानबा लाडे (४७) यांचे मतदानाच्या दिवशीच बुधवारी सकाळी ६ वाजता निधन झाले. मात्र दुःखात असलेल्या माऊलीने आणि घरातील सर्व सदस्यांनी आधी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
घरात पतीचा मृतदेह, संपूर्ण कुटुंबावर दुःखाचे सावट तसेच स्वतः पतीच्या दुःखवियोगात असतानाही त्या माऊलीने मतदान करण्याचा निर्णय घेतला. जन्मदात्या पित्याचे छत्र हरवल्याने त्यांच्या मुलींही दुःखात होत्या मात्र त्यांनीदेखील आपल्या आईसोबत मतदान केंद्रावर जाऊन मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. त्यानंतर घरी येऊन त्यांनी शंकर लाडे यांच्यावर अंत्यसंस्कार केले.