निकाल लागण्याच्या आधीच मुख्यमंत्रीपदावरुन मविआत घमासान!

    21-Nov-2024
Total Views |
 
MVA
 
मुंबई : विधानसभा निवडणूकीसाठी राज्यभरात मतदान पार पडले. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. मात्र, त्याआधीच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा एकदा घमासान सुरु झाले आहे. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्यात शाब्दिक वॉर पाहायला मिळाला.
 
मतदानानंतर नाना पटोले म्हणाले की, "महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वातच महाविकास आघाडीचे सरकार बनणार आहे. ज्याप्रमाणे मतदानाचा कौल आहे त्यानुसार राज्यात सर्वात जास्त काँग्रेसचेच उमेदवार निवडून येतील आणि महाविकास आघीडीचे सरकार निवडून येईल," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  आम्ही १०५ चा आकडा पार करणार; चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास
 
याबाबत पत्रकारांनी संजय राऊतांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, "मी हे मानत नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत आम्ही महाविकास आघाडीचे सरकार बसून चर्चा करू. नाना पटोलेंनी असे म्हटले असेल आणि काँग्रेस हायकमांडने त्यांना मुख्यमंत्रीपदाबाबत सांगितले असेल तर राहूल गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जून खर्गे यांनी ते जाहीर करायला हवे," असे ते म्हणाले.