मविआला १६० ते १६५ जागा मिळणार; एक्झिट पोलच्या अंदाजानंतर संजय राऊतांचा दावा
21-Nov-2024
Total Views |
मुंबई : महाविकास आघाडीला १६० ते १६५ जागा मिळणार असून आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करणार आहोत, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी केला आहे. विधानसभा निवडणूकीनंतर विविध एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात पून्हा एकदा महायूतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
संजय राऊत म्हणाले की, "काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना या तिघांना मिळून आम्हाला सत्ता स्थापनेजोगे बहुमत प्राप्त होईल. महाविकास आघाडी महाराष्ट्रात २६ तारखेला सत्ता स्थापन करेल. २३ तारखेला निकाल लागतील आणि संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करु शकतो. महाविकास आघाडीच्या १६० ते १६५ एकत्रित जागा निवडून येतील. त्यामुळे या एक्झिट पोलवर कुणीही विश्वास ठेवू नये. हे भाजपचे मोठे षडयंत्र आहे. आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरलेत हा एक संशोधनाचा विषय आहे," असे ते म्हणाले.