राज्यात १०० टक्के महायूतीचे सरकार येणार! छगन भुजबळांचा विश्वास
21-Nov-2024
Total Views |
मुंबई : विधानसभा निवडणूका पार पडल्या आणि आता सर्वांच्याच नजरा निकालाकडे लागल्या आहेत. दरम्यान, अशातच राज्यात १०० टक्के महायूतीचे सरकार येणार असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, "लोकसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्रातील जनतेत मोठा बदल झाला आहे. शेतकरी, महिला आणि समाजातील सर्वच घटकांसाठी सरकारने योजना राबवल्या. गेल्या सहा महिन्यात महायुती सरकारने अनेक योजना अंमलात आणल्या. त्यावेळी विरोधकांकडून संविधान बलणार यासारखे वेगवेगळे खोटे नरेटिव्ह पसरवण्यात आले. परंतू, पंतप्रधान मोदीजींनी कोणतीही शक्ती संविधान संपवू शकत नाही, असे सांगितले. राज्यभरात फिरत असताना या सगळ्याचा परिणाम दिसत होता. लोकांमध्ये मोठा बदल दिसला. त्यामुळे एक्झिट पोलनुसार, १००% महायुतीचे सरकार येईल असा मला विश्वास आहे," असे ते म्हणाले.