गोड्या आणि खार्‍या पाण्यातील मासेमारांसाठी स्वतंत्र महामंडळ

    06-Oct-2024
Total Views |
 
cabinet
 
मुंबई : (Fishermen Weelfare Corporation)गोड्या आणि खार्‍या (सागर आणि खाडी) पाण्यातील मासेमारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील शासन आदेश काढण्यात आला आहे. दोन्ही महामंडळांसाठी प्रत्येकी ५० कोटी रुपये इतके भांडवल शासनाकडून देण्यात येणार आहे.
 
कोकणाला मोठा समुद्र किनारा असल्याने विशेषत: कोकणातील मासेमारांना सागरी महामंडळ, तर अन्य भागांतील गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी भूजलाशयीन महामंडळ लाभदायी ठरणार आहे. मासेमारी करणार्‍या नागरिकांचे जीवनमान उंचावणे, परंपरागत मासेमारी करणार्‍या नागरिकांच्या हिताचे जतन करणे, त्यांच्या आरोग्य आणि शिक्षण विषयक समस्यांवर उपाययोजना काढणे, मासेमारांना त्यांच्या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, मासेमारीतून उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, मासे वाळवणे आणि त्यांची विक्री या प्रक्रियेत मासे टिकून रहाण्यासाठी उपाययोजना काढणे यांसाठी ही दोन्ही महामंडळे स्वतंत्रपणे कार्यरत रहाणार आहेत. महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळाचे मुख्य कार्यालय नागपूर येथे, तर महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळाचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असणार आहे.