ह्युमन वेल्फेअर क्रेडिट अॅंड थ्रिफ्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (एचडब्ल्यूसी) या संस्थेच्या प्रचारासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अभिनेता श्रेयस तळपदे यांनी काम केले होते. या प्रचार जाहिरातीमध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोपप्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदे यांना सोमवार दि. २१ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि न्या के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले आहे.
Read More
(Vaishnavi Hagawane Case) वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. महिला बाल हक्क अणि कल्याण समितीने याप्रकरणी आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात हुंड्यासाठीच वैष्णवीचा बळी गेल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच तत्कालीन पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्याची शिफारस समितीने या अहवालातून केली आहे.
कल्याण पूर्वेतील चेतना नाका ते नेवाळी नाका रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार असून यासाठी एमएमआरडीएने १२४.८७ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली असून लवकरच रस्त्याच्या कामाची निविदा काढली जाणार आहे. तर कल्याण पूर्वेतील काटेमानिवली, सिद्धार्थनगर, तीसगाव नाका हा यू टाइप रस्ता महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाकरिता एमएमएमआरडीएने ७६.८८ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली. रस्त्याच्या कामाचीही निविदा लवकरच काढली जाणार आहे. हा रस्ता झाल्याने कल्याण पूर्वेतील वाहतुकीला
देशातील जगप्रसिद्ध मंदिरांवर शासनाचे नियंत्रण असून, मंदिरांचे नियंत्रण व व्यवस्थापन हिंदूंकडे देऊन मंदिरात दान येणाऱ्या धनसंपत्तीचा उपयोग हिंदू समाजहितासाठीच व्हावा. तसेच व्यसनाधीन युवक देशासाठी गंभीर मुद्दा आहे. यासाठी बजरंग दल व दुर्गा वाहिनीतर्फे जनजागृतीपर विशेष अभियान राबविले जाईल. यांसह इतर विषयांवर जळगावातील केंद्रीय प्रबंध समितीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बैठकीत चर्चामंथन होऊन अभियानाची दिशा ठरविली जाईल, असे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री बजरंगलालजी बागडा यांनी सांगितले.
पंचदशी मंत्रातील द्वितीय क्रमांकाचे ‘ए’ हे बीज ज्ञानशक्तीचे, वाणीशक्तीचे आणि आत्मबोधाचे मूळ बीज आहे. श्रीविद्या उपासनेत हे बीज सरस्वतीसमान तेज आणि मेधा देणारे आहे. ध्यान, जप आणि तांत्रिक अनुष्ठानांमध्ये याचा योग्य प्रकारे उच्चार केल्यास, साधकाला ब्रह्मविद्या आणि आत्मज्ञानात उन्नती प्राप्त होते. ‘ए’ हे बीज ‘अहं ब्रह्मास्मि’ या आत्मज्ञानाच्या भावनेशी संबंधित मानले जाते. ‘ए’ म्हणजे पराब्रह्माचे प्रकट रूप, आत्मा आणि ब्रह्म यांची अद्वैतता. ए = जिथे ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय एकरूप होतात, असे एकत्व व्यक्त करते. कुंड
भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेच्या (भटके विमुक्त विकास परिषदेशी संलग्न संस्था) पुढाकाराने आणि महसूल विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत आज तिरोडा तहसील कार्यालयात मांग-गारुडी समाजासाठी विशेष जात प्रमाणपत्र शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकाच दिवशी ६२१ जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले, ही महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या असल्याचे सांगण्यात येते.या कार्यक्रमात गोंदिया जिल्हाधिकारी मा. प्रजित नायर, डॄज मा. पूजा गायकवाड, तहसीलदार मा. ठाकरे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस
हिंदू अल्पसंख्याक आणि पालकत्व कायदा, १९५६ नुसार आईच्या अगोदर वडील हे अल्पवयीन मुलाचे किंवा अविवाहित मुलीचे नैसर्गिक पालक असतील. या कायदाच्या घटनात्मकतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवार, दि.२३ जून रोजी म्हटले की, “अपत्य स्विकारण्याबद्दल पालकाचा तटस्थ लिंग दृष्टिकोन हा पितृसत्ताक समाजाचे लक्षण आहे.
जी व्यक्ती राज्य सरकारच्या नोंदणीकृत सोसायट्यांमध्ये कार्यरत आहे, तिला संविधानाच्या कलम १२ अंतर्गत सरकारी व्यक्ती समजता येणार नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने सोमवार, दि. १६ जून रोजी त्रिपूरा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेसंदर्भात दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. उज्जल भुयान आणि न्या.मनमोहन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली
भारत हा देश आदर्शांचाच! अनेक तेजस्वी आदर्श याच देशात जन्मले. ‘भा’ अर्थात ‘तेज’ आणि ‘रत’ म्हणजे ‘रमणारा’ अशीच भारत शब्दाची एक व्युत्पत्ती. राज्यकारभार, समाजकारण संस्कृतीरक्षण आणि धर्मस्थापना यामध्ये आदर्शवत असणार्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्ताने त्यांच्यातील गुणसंपदेचा घेतलेला आढावा....
पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाचा सांभाळ करण्याची जबाबदारी वैष्णवीची आई स्वाती आनंद कस्पटे यांच्याकडे देण्यात आली आहे. बाल कल्याण समितीने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिली.
पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नाही, तर ती कामगारांच्या तळहातावर आहे. राज्यातील कामगार जर आनंदी आणि सुखी राहिला, तर त्या देशाची प्रगती आणि विकास नक्की आहे. कामगार, ज्यामध्ये संघटित आणि असंघटित अशी विभागणी आहे, हे दोन्ही घटक आपली खूप मोठी भूमिका बजावत आहेत. त्यामुळे त्यांचे हित जोपासण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.
वक्फ कायद्याविरोधात नव्याने याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी याबद्दल झालेल्या सुनावणीत वक्फ सुधारणा कायद्याविरुद्धात कॉपी-पेस्ट याचिका नको, अशा शब्दांत कानउघडणी केली आहे. वक्फ सुधारणा कायदा २०२५ ला आव्हान देणारी कोणतीही नवीन रीट याचिका दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
Public welfare schemes केंद्र सरकारने लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘डीबीटी’ प्रणालीचा केलेला वापर, यातील गळती थांबवून थेट निधी हस्तांतरित करण्याचे काम नेमकेपणाने करत आहे. खर्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत पूर्ण पारदर्शकतेने काम करणारी ही योजना, दलालांना बाजूला करणारी ठरली आहे. म्हणूनच, आज बहुतांश योजनांच्या अंमलबजावणीसाठी हीच प्रणाली वापरली जाते.
social welfare work of Laxmanrao Mankar Memorial Foundation विदर्भातील सात जिल्ह्यांत गेली 29 वर्षे शिक्षणासह आरोग्य, रोजगाराचा वसा घेऊन कार्यरत असलेली संस्था म्हणून ‘कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था’ परिचित आहे. विदर्भापलीकडे जात संपूर्ण महाराष्ट्रात अंत्योदयातून समाजोन्नती साधण्यासाठीच्या व्यापक चळवळीचा शुभारंभ आणि एक अनोखा पुरस्कार सोहळा आज दि. 14 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता, मुंबईतील पु. ल. देशपांडे सभागृह, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाह
(CM Devendra Fadnavis) “राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून रुग्णसेवा देत असते. आरोग्य विभागाच्या विविध योजनांमधून आणि पुढील आराखड्यामध्ये रुग्णकेंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात यावा,” असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. ८ जानेवारी रोजी दिले. आरोग्य विभागाच्या सर्व आरोग्य यंत्रणेतील घटकांचे पुढील दिवसांत मूल्यमापन चांगल्या संस्थांकडून करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
ठाणे : केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारे दाखले व प्रमाणपत्रांकरिता ठाणे शहर भाजपाच्या ( BJP ) वतीने ठाण्यात शहरभर शिबिरे सुरू झाली आहेत. नागरिकांच्या सुविधांसाठी टपाल विभागाच्या माध्यमातून आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबीर, आदित्य बिर्ला आरोग्य विमा, नवीन मतदार नोंदणी, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आणि अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरे भरविण्यात आली आहेत. अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली.
(Fishermen Weelfare Corporation)गोड्या आणि खार्या (सागर आणि खाडी) पाण्यातील मासेमारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील शासन आदेश काढण्यात आला आहे. दोन्ही महामंडळांसाठी प्रत्येकी ५० कोटी रुपये इतके भांडवल शासनाकडून देण्यात येणार आहे.
रोजगारनिर्मितीकरिता असलेल्या कल्याणकारी योजना देशातील तरुणांना रोजगार शोधण्यापासून रोखत आहेत का याचा अभ्यास केला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेश्वरन यांनी केले आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे योगदान महत्वाचे आहे. मंडळाच्या माध्यमातून अनेक नामवंत कलाकार, साहित्यिक, खेळाडू नावारुपाला आले असून याचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रतिपादन कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, १ जुलै रोजी प्रभादेवी मुंबई येथील हुतात्मा बाबू गेनू मुंबई कामगार क्रीडा भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
विद्यार्थीदशेत शाळेच्या मासिकात लिखाणाचा श्रीगणेशा करून उतारवयातही साहित्यात मुशाफिरी करणार्या चतुरस्र लेखिका माधुरी वैद्य यांच्याविषयी...
दिल्ली उच्च न्यायालयाने निरीक्षण केले आहे की, राष्ट्रीय राजधानीसारख्या शहरात राहण्याचा खर्च पाहता इमारत आणि बांधकाम कामगारांना मासिक पेन्शन ३००० रुपये कमी आहे. जे दिल्ली इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत आहेत, त्यांना ६० वर्षे पूर्ण झाल्यावर ३००० रुपये इतकी मासिक पेन्शन देण्यात येते. “कोणत्याही खात्यानुसार, पेन्शनचा दर मासिक दर, जो रु. ३००० दिल्लीसारख्या शहरात राहण्याचा खर्च पाहता, कमी आहे,” न्यायमूर्ती राजीव शकधर आणि न्यायमूर्ती अमित बन्सल यांच्या खंडपीठाने सांगितले.
बहुजन, कष्टकरी महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरवण्याचे काम या मतदारसंघात आम्ही केले. शिवाय केंद्र सरकारच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना खेड्यापाड्यात राबवण्याचा संकल्प केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी गुरुवार, दि. २५ एप्रिल रोजी दिली.
उन्हाळ्याची तीव्रता जशी वाढत जाते तशी तहान वाढत जाते. मनुष्याप्रमाणे प्राण्यांनाही त्याची तीव्र झळ बसते. या पार्श्वभूमीवर पर्यावरण समतोलाचा संदेश देत निसर्गाचा अविभाज्य भाग असलेल्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी कल्याणमधील ‘इको ड्राईव्ह यंगस्टर्स’ ही संस्था काम करतेे. संस्थेच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाश.
आई, पत्नी, सून, मुलगी इथंपासून ते शिक्षिका, समाजसेविका, क्रिकेटर अशी अनेक बिरुदे मिरवणार्या आणि तेवढ्याच साकल्याने त्या सर्व जबाबदार्या पेलून, आपलं अस्तित्व सिद्ध केलेल्या अभिलाषा वर्तकविषयी...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात दौरे करत आहेत. शुक्रवार, दि. १५ मार्च २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या दौऱ्यावर गेले आहेत. आपल्या तामिळनाडू दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कन्याकुमारी येथे एका जाहीर सभेत विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला.
बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची मागणी अखेरीस पूर्ण होणार असून यासंबंधी निकाल बँक कर्मचारी युनियनने बैठक जाहीर झाला आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनात १७ टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे या बैठकीत ठरले आहे. निगोशिएटिंग कमिटी ऑफ इंडियन बँक असोसिएशन (आयबीए) व बँक अधिकारी असोसिएशन व कामगार युनियन यांच्या संयुक्त बैठकीत हा निष्कर्ष काढण्यात आला असून पब्लिक सेक्टर युनिट (PSU Bank) बँकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार आहे.
कामगार विश्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा यंदाचा ¨कामगार केसरी° किताब धाराशिवच्या मुंतजीर सरनोबत याने पटकावला असून कुंभी कासारीचा नृसिंह पाटील हा ¨कुमार केसरी° किताबाचा मानकरी ठरला आहे. कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते विजेत्यांचा मानाची गदा, मानाचा पट्टा आणि रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
"मेडटेक मित्र हे एक असे व्यासपीठ आहे जे देशातील तरुण प्रतिभावंतांना त्यांचे संशोधन, ज्ञान, तर्कशास्त्र इत्यादीं क्षेत्रात पाठबळ देत नियामक मान्यता मिळविण्यात मदत करेल", असा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केला.
नागपूर: इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ३ हजार ३७७ कोटींच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाली. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी यासाठी पुढाकार घेतला.
रेलिगेअर एंटरप्राइजेस लिमिटेड (आरईएल) आणि आर्मी वाइव्ह्ज वेल्फेअर असोसिएशन (एडब्ल्यूडब्ल्यूए) यांनी आज नवी दिल्लीमधील व इतरत्र असलेल्या आशा स्कूल्सच्या आधुनिकीकरण व सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून विशेष-विकलांग मुलांच्या आरोग्याप्रती त्यांच्या दीर्घकालीन कटिबद्धतेची घोषणा केली. विशेष-विकलांग मुलांच्या क्षमतांना निपुण करण्यासाठी एडब्ल्यूडब्ल्यूएद्वारे देशभरात ३२ आशा स्कूल्सचे कार्यसंचालन पाहिले जाते. आशा स्कूल्स भारतातील विविध शहरांमधील जवळपास १२०० मुलांचे पालनपोषण करत आहेत, ज्यामध्
कल्याण डोंबिवलीतील वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. कल्याण डोंबिवलीतील हवेची गुणवत्ता खालावली असून एक्यूआय इंडेक्सने 200 ची पातळी ओलांडल्याचे दिसत आहे. त्यामुळे दमा किंवा श्वसनाशी संबंधित आजार असणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.
विशेष संसद अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरु असून महिला व बाल कल्याण विकास मंत्री स्मृती ईराणी यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या नेतृत्वात देशातील तरुणींसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या असून त्यांच्यासाठी देशाच्या इतिहासात राष्ट्रीय शिक्षण निधीमध्ये मुलींसाठी वेगळ्या स्वरुपात निधीची तरतूद करण्याची व्यवस्था मोदी सरकारच्या काळात झाल्याचे केंद्रीय महिला व बालकल्याण विकास मंत्री स्मृती ईराणी म्हणाल्या.
नोकरी करीत असताना विविध सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांना विश्वकर्मा आदर्श कामगार पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कार २०२२-२३ करीता अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे करण्यात आले आहे.
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत 'ICAR- NBSS & LUP' नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे, या भरतीच्या माध्यमातून प्रोग्रामर-कम-आयटी तज्ञ, सीनियर प्रोजेक्टसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहयोगी, ज्युनियर प्रोजेक्ट असोसिएट, प्रकल्प सहाय्यक (I आणि II) आणि लॅब अटेंडंट या पदांसाठी थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत.
मतिमंद आणि मूक कर्णबधिर मुलांच्या शैक्षणिक आणि शारीरिक प्रगतीसाठी गेली ४१ वर्ष ‘अस्तित्व’ संस्था काम करीत आहे. एवढेच नव्हे, तर या मुलांना प्रशिक्षण देऊन छोटे छोटे उद्योग करण्यासाठी सक्षम केले आहे. जेणेकरून ते पुढील जीवन सन्मानाने जगू शकतील. या संस्थेने लोकाग्रहास्तव नुकतेच वृद्धाश्रमदेखील सुरू केले आहे. आयुष्याची संध्याकाळ ही आनंददायी करण्याचा संस्थेचा हा एक नवीन प्रयत्न आहे. ज्येष्ठ नागरिक असो किंवा विशेष मुले त्यांच्या चेहर्यावर हसू उमटविण्यासाठी ‘अस्तित्व’ची सततची धडपड वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या या का
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्यावतीने बोरीवली येथे महिलांच्या सक्षमीकरणाबाबत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी उपयुक्त साधने त्यांना यावेळी देण्यात आली. दरम्यान, बोरीवली विधानसभा व बृहन्मुंबई महानगरपालिका आर, मध्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने बोरिवली पश्चिम, शिंपोली रोड, गोखले हॉल येथे आयोजित महिला व बालकल्याण योजने अंतर्गत महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून स्वयंरोजगारांसाठीच्या शिलाई मशिन व घरघंटी वाटपाला उपस्थिती दर्शविली. यावेळी समाज विकास अधिकारी महें
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील दिव्यांगांच्या २१ प्रकारानुसार दिव्यांग व्यक्तींचा ॲपद्वारे सर्व्हे करण्याच्या उद्देशाने 'दिव्यांग व्यक्तीचे सर्व्हेक्षण प्रणाली' तयार करण्यात आली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
लासलगाव : राज्यातील शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी ‘नाफेड’ मार्फत लवकरच उन्हाळ कांदा खरेदी सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी दिली. या हंगामात कांद्याच्या घसरत्या दरांमुळे शेतकर्यांना मनस्ताप सहन करावा लागला. त्या अनुषंगाने ‘नाफेड’ने प्रथमच लाल कांद्याची खरेदी सुरू केली. आता उन्हाळ कांद्याची देखील खरेदी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने सरकारने पाऊले उचलली आहे, असे डॉ. पवार यांनी सांगितले. लासलगाव बाजार समितीत डॉ. पवार यांनी भेट दिली. त्यावे
नाशिकमधून हैद्राबादकडे जाणार्या उंटांचा ताफा नुकताच नाशिकमधील तपोवनात पकडण्यात आला. प्रवासात अन्न पाणी न मिळाल्याने यातील दोन उंटांचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेला २४ तास होत नाही तोच मखमलाबाद शिवारात गेल्या शुक्रवारी पुन्हा २९ उंटांता ताफा आढळून आला. इतक्या मोठ्या प्रमाणात उंटांची वाहतूक का केली जात आहे याबद्दल अजून तरी सरकारी पातळीवरून काहीही विधान करण्यात आले नसले तरी हे उंट कत्तल करण्यासाठी नेले जात होते, अशी माहिती प्राणिप्रेमी आणि ‘अॅनिमल वेल्फअर’चे पुरुषोत्तम आव्हाड देतात.
पुणे : सामान्य रूग्णांसाठी आवाक्यातील खर्चात गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवांच्या उद्देशाने पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान संचलित बाळासाहेब देवरस रूग्णालयाच्या भूमिपूजन सोहळा शनिवार, २२ एप्रिल २०२३ रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होतो आहे. कात्रज भागातील खडी मशीन चौकात ८०० बेडचे हे रूग्णालय दोन टप्प्यात उभारले जाणार आहे. अशी माहिती बाळासाहेब देवरस पॉलीक्लीनिकचे अध्यक्ष शिरीष देशपांडे आणि कार्यवाह बद्रीनाथ मूर्ती यांनी दिली.
कल्याण : रा स्व संघ जनकल्याण समिती कल्याण जिल्हा संचालित, साई ब्लड स्टोरेज सेंटरचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. शहापूर सारख्या वनवासी भागात गंभीर रुग्णांना लवकरात लवकर रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ ठाणे यांच्या आर्थिक सहकार्याने हे केंद्र शहापूर येथे सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी ठाण्यातील कै वामनराव ओक रक्तपेढी चे बहुमोल सहकार्य लाभले आहे. झपाट्याने वाढणाऱ्या शहापुरात वाढते अपघात,नित्य होणाऱ्या शस्त्रक्रिया आणि रुग्णांमधील रक्ताल्पता विचारात घेऊन हे केंद्र येथे सुरू करण्यात आले आहे
मुंबई : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. बोरिवली येथील वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी १५ ते ३० एप्रिल दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्तांनी केले आहे.
राष्ट्रीय विचारांची जोपासना व्हावी, या विचाराने प्रेरित होऊन २०१० साली सिंहगड रोड भागात काही कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर व्याखानमालेचे आयोजन केले आणि आजवर ही वाटचाल यशस्वीपणे अव्याहत चालू आहे. यातून संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी हितचिंतकांनी ‘स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान’ची स्थापना केली. नुसते एवढ्यावर न थांबता विविध आयामांत संस्थेचा विस्तार केला. आरोग्य शिबिरे, दवाखाना, नैपुण्य वर्ग, किशोरी दर्पण वर्ग, अभ्यासिका असे अनेक उपक्रम सुरू केले.‘कोविड’सारख्या कठीण काळात न थांबता संस्थेचे उपक्रम चालू ठ
समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्याचे ‘मंथन फाऊंडेशन’च्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांपासून काम करणार्या आशा भट्ट यांच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती २०२२-२०२३च्या निमित्ताने ‘सेवा भवन’ या सात मजली वास्तूचे लोकार्पण सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते आज, शनिवार, दि. ४ मार्च रोजी पुण्यात होत आहे. यानिमित्ताने या प्रकल्पाची ओळख करून देणारा लेख.
‘केमिकल इंजिनिअरिंग’ ते ‘बीएनएचएस’मध्ये ‘नॅचरल एक्सप्लोरिस्ट’ म्हणून वन्यजीव क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या मंदार सावंत यांच्या अद्भुत प्रवासाविषयी...
भारतीय समाज कुटुंब पद्धतीवर आधारलेला आहे. आई-वडिलांनी त्यांच्या मुलांचे शिक्षण व संवर्धन करावयाचे व आई-वडील वयस्कर झाल्यानंतर मुलांनी त्यांची काळजी घ्यावयाची, ही भारतीय परंपरा आहे. मात्र, अनेक कारणांनी ती परंपरा कमकुवत होऊ लागलेली आहे. विभक्त कुटुंब, आर्थिक परिस्थिती व तुटकपणाची मानसिकता यामुळे कौटुंबिक जीवनावर निश्चितच परिणाम झालेला आहे. मुलगा व मुलगी अगर नातेवाईक यांना ‘पालक व ज्येष्ठ नागरिक यांच्या पोटगी व कल्याण कायदा, 2007’ मुळे ती जाणीव करून देण्याचा कायद्याचा हेतू आहे.
भारतीय बौध्द महासभेचे मुंबईचे अध्यक्ष अॅड. जयेश सातपुते यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अॅड. सातपुते यांनी अनेक समाज कल्याणकारी कामे केली आहेत.
संघमय वातावरणात राहिलेल्या आणि पुढे नोकरी करताना व नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर जनकल्याण समितीच्या माध्यमातून सेवाकार्य करणार्या गिरीश दीक्षित यांच्याविषयी आज जाणून घेऊया...
‘दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्रा’च्या व्यवस्थापन मंडळाचेअॅड. मुरलीधर कचरे यांच्याविषयी आज जाणून घेऊया...