पुणे : बदलापूरनंतर आता पुणे शहर अत्याचाराच्या घटनेने हादरलं आहे. पुण्यात एका स्कुल बसमध्ये बस चालकाकडून दोन चिमुकलींवर अत्याचार करण्यात आला आहे. पुण्यातील वानवडी परिसरात ही घटना घडली. तसेच मुलींची कुणालाही हा प्रकार न सांगिण्याची धमकीही देण्यात आली.
पुण्यातील एका नामांकित शाळेतील दोन ८ वर्षीय चिमुकलींवर एका ४५ वर्षीय नराधमाकडून अत्याचार करण्यात आला. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली असून याबाबतचा अधिक तपास सुरु आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
हे वाचलंत का? - महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती अभियान! शक्तीबॉस नावाची तक्रारपेटीही सुरु करणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलिस स्टेशनमध्ये दोन अल्पवयीन मुली आपल्या आईसह तक्रार घेऊन आल्या होत्या. बसचालकाने त्या मुलींवर अत्याचार केल्याची तक्रार त्यांनी दाखल केली. दरम्यान, त्या चालकावर तात्काळ पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.