उबाठा गट ही 'डी' कंपनी आहे असं आम्ही म्हणायचं का? नितेश राणेंचा राऊतांना सवाल

    18-Oct-2024
Total Views |
 
Sanjay Raut
 
मुंबई : उबाठा गट ही 'डी' कंपनी आहे असं आम्ही म्हणायचं का? असा सवाल भाजप नेते नितेश राणेंनी संजय राऊतांना केला आहे. संजय राऊतांनी भाजपवर केलेल्या टीकेला त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले.
 
नितेश राणे म्हणाले की, "भाजप पक्ष हा बिश्नोई गँग आहे असा जावईशोध संजय राऊतांनी काढला आहे. मैदानात आम्हाला हरवू शकत नसल्याने ते असं बावळट बोलून स्वत:ची प्रसिद्धी करून घेतात. त्यामुळे आता शिवसेना उबाठा ही डी कंपनी आहे, असं आम्ही म्हणायचं का? हिंदूद्वेष करणं, पाकिस्तानचे झेंडे मिरवत घोषणा देणं, हे सगळे दाऊद गँगचे गुण उबाठा गटाने घेतले आहे. त्यामुळे दुसऱ्यांना उपमा देण्यापेक्षा उबाठाची डी कंपनी झाली त्यावर लक्ष द्या," असा खोचक टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे.
 
हे वाचलंत का? -  ठाण्यात मनसे लढवणार चारही जागा! मुख्यमंत्री शिंदेंविरोधात देणार 'हा' उमेदवार
 
मविआचे नेते उद्धव ठाकरेंना लायकी दाखवतात!
 
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सुरु असलेल्या वादावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, "शरद पवार साहेबांनी काल ईश्वरपूरमधून उद्धव ठाकरेंच्या कानफडीत मारली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे दिवसरात्र मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे, शरद पवार, नाना पटोले हे त्यांना त्यांची लायकी दाखवत आहेत," असेही ते म्हणाले.