ठाण्यात मनसे लढवणार चारही जागा! मुख्यमंत्री शिंदेंविरोधात देणार 'हा' उमेदवार
18-Oct-2024
Total Views |
ठाणे : मनसेने स्वबळावर विधानसभा निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतला असून आता मनसेने ठाणे शहरातील चारही मतदारसंघात निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे. दरम्यान, या चारही मतदारसंघातील उमेदवारांची नावेदेखील पुढे आली आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहरातील चारही मतदार संघात उमेदवार देण्याची शक्यता आहे. ठाणे शहरातील कोपरी - पाचपाखाडी, ठाणे शहर, ओवळा - माजिवडा आणि कळवा- मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज ठाकरे याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
कोण कोणाच्या विरोधात?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अभिजित पानसे, आमदार संजय केळकर यांच्याविरोधात अविनाश जाधव, आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात संदीप पाचंगे किंवा पुष्कर विचारे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सुशांत सूर्यराव हे उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे.