लोकसभेच्या निकालाला काय म्हणायचं? EVM घोटाळा की, वोट जिहाद? किरीट सोमय्यांचा सवाल
18-Oct-2024
Total Views |
मुंबई : लोकसभेच्या निकालाला काय म्हणायचं? EVM घोटाळा की, वोट जिहाद? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी आणि संजय राऊतांना केला आहे. हरियाणा विधानसभेच्या निकालानंतर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
किरीट सोमय्या म्हणाले की, "हरियाणामध्ये भाजपचे सरकार आल्यावर राहुल गांधी आणि संजय राऊत ईव्हीएम घोटाळा, असं सांगतात. मग लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेस महाविकास आघाडीला २ कोटी ५१ लाख मतं मिळाली. तर भाजप एनडीए ला २ कोटी ४९ लाख मते मिळाली, मविआला महायुती पेक्षा फक्त २ लाख मतं अधिक मिळाली. महाविकास आघाडीचे ३१ खासदार तर महायूतीचे १७ खासदार निवडून आलेत. मग याला काय म्हणायचं? EVM घोटाळा की, वोट जिहाद," असा सवाल त्यांनी केला आहे.