काँग्रेसमध्ये डावलण्याचा प्रयत्न! खुद्द काँग्रेस आमदाराचा खुलासा; पक्षाला रामराम ठोकणार?

    12-Oct-2024
Total Views |
 
Sulbha Khodke
 
मुंबई : काँग्रेसमध्ये अनेक लोकांनी प्रवेश केल्याने मला डावलण्याचा प्रयत्न होत आहे, असा खुलासा अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांनी केला आहे. त्यामुळे त्या पक्षाला रामराम ठोकणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
 
माध्यमांशी बोलताना सुलभा खोडके म्हणाल्या की, "काँग्रेसमध्ये काही लोकांनी प्रवेश केल्याने त्यांनी मला डावलण्याचा प्रयत्न केला. गेल्या अनेक मीटिंगमध्ये काँग्रेसचे अनेक नेते अमरावतीमध्ये येऊन गेलेत. परंतू, प्रत्येक मीटिंगला मला बोलवण्यात आले नाही. त्यामुळे मी नाना पटोलेंना याबाबत विचारले. मी काम करत असूनही मला का बोलवलं जात नाही, असं मी त्यांना विचारलं. पण त्यांनी मला उत्तर दिलं नाही. माझे फोनही उचलले नाहीत," असे त्या म्हणाल्या.
 
हे वाचलंत का? -  "तुम लाख कोशिश करो हमें हराने की..."; पंकजाताईंच्या दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंचं तुफान भाषण
 
त्या पुढे म्हणाल्या की, "याआधी अमरावतीमध्ये होत असलेल्या प्रत्येक कार्यक्रमात मला बोलवलं जात होतं. परंतू, नंतर काही लोकांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर मला डावलण्यात आलं. पक्षाचे पदाधिकारी आणि जिल्ह्यातील नेत्यांवर माझी नाराजी आहे. सध्यातरी मी काँग्रेसमध्येच आहे. आचारसंहिता संपल्यावर जो मला तिकीट देईल त्याच्यासोबत मी लढणार आहे," असेही त्यांनी सांगितले.