इस्लामाबाद : पाकिस्तानमधील सुन्नी उलेमा कौन्सिलचे उपाध्यक्ष आणि आपल्या हिंदूविरोधी भाषणांसाठी प्रसिद्ध असलेल्या मौलाना मसूद उर रहमान उस्मानीची अज्ञात हल्लेखोरांनी भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या केली आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये राहणारे मौलाना मसूद-उर-रहमान उस्मानी हे भारत आणि हिंदू धर्मीयांविरोधात विवादास्पद वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध होते. यासोबत ते अधून-मधून शिया मुस्लीमांविरोधात सुद्धा गरळ ओकायचा.
त्याच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बाईकस्वारांनी भरदिवसा रस्त्याच्या मध्यभागी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. इस्लामाबादमधील मौलाना मसूद उर रहमान उस्मानी यांच्या हत्येत दोन ते तीन दुचाकींचा वापर करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारेकरीही दिसत आहेत, त्यांनी मास्क घातलेले आहेत. वर्दळीच्या रस्त्यावर ते उस्मानीला गोळ्या घालतात आणि तिथून निघून जातात. या हत्याकांडात अद्याप एकही मारेकरी सुरक्षा दलाच्या हाती लागलेला नाही. या हत्याकांडाने पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा 'अज्ञात हल्लेखोरां'ची भीती निर्माण झाली आहे.