नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)ने भारताच्या आर्थिक विकासदर वाढीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. देशाच्या आर्थिक विकासाचा दर वेगाने वाढत असताना आयएमएफकडून यासंदर्भात सकारात्मक अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, 'आयएमएफ'ने आर्थिक वर्ष २०२४ करिता विकासदर ६.३ टक्क्यांवरून ६.७ टक्के इतका राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच, जागतिक विकासदरात देखील वृध्दि होण्याचा अंदाज आयएमएफकडून व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये विकास दर ६.५ टक्क्यांवर राहणार असून रिझर्व्ह बँकेकडून जीडीपी वाढ ७ टक्क्यांपेक्षा अधिक राहील, असा अंदाज वर्तविला आहे. तसेच, देशांतर्गत विकासदरात वाढ स्थिर राहणार असून आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था ३ ट्रिलियन डॉ़लरपर्यंत नेण्यासाठी सरकारकडून आर्थिक धोरण आखण्यात येत आहेत.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज पुढीलप्रमाणे :
(भारत)
जागतिक वाढ
वर्ष विकासदर
२०२४ ६.७