कॅनडाच्या सरकारी न्यूज चॅनलनेच केली 'ट्रूडों'ची पोलखोल

भारतीय राजनयिकांवर कॅनडाने ठेवली पाळत; कॉल टॅपिंग केल्याचाही आरोप

    22-Sep-2023
Total Views |
 justin-trudeau
 
मुंबई : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोंनी कोणत्याही पुराव्यांविना भारताविरुद्ध लावलेल्या आरोपांमुळे दोन्ही देशातील संबंध बिघडलेले आहेत. दोन्ही देशांनी उच्चपदस्थ राजनयिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. यातच आता नवा खुलासा झाला आहे. कॅनडाने भारतीय राजनयिकांचे कॉल टॅपिंग केल्याचा, दावा कॅनडाच्या सरकारी मिडीयाने केला आहे.
 
खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंटचा सहभाग असल्याचा कॅनडाचा विश्वास भारतीय अधिकाऱ्यांशी झालेल्या संभाषणाच्या कॉल रेकॉर्डवर आधारित असू शकतो. असा दावा कॅनडा सरकारच्या मालकी असलेल्या सीबीसी न्यूजने केला आहे.
 
सीबीसीच्या न्यूजच्या रिपोर्टनुसार, कॅनडाने भारतीय राजनयिकांवर आणि अधिकाऱ्यांवर पाळत ठेवली होती. त्यासोबतच कॅनडाने भारतीय राजनयिकांचे फोनची सुद्धा कॉल टॅपिंग करण्यात आले होते. सीबीसी न्यूजच्या या दाव्यांमुळे भारत आणि कॅनडाच्या संबंधात तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.