हवीहवीशी सकारात्मक लवचीकता

    07-Aug-2023
Total Views | 73
Article On Human Psychology

लवचिकतेची कौशल्ये विकसित केल्याने तुम्हाला जीवनातील आव्हाने आणि अडचणींचा सामना करण्यास मदत होऊ शकते, जे तुम्हाला चांगले जगण्यास आणि संकटांचा सामना चांगल्या प्रकारे करण्यास मदत करू शकते.
 
लवचिकता म्हणजे अडचणींचा प्रतिकार करत त्यातून सावरण्याची क्षमता. जे लोक आपत्तीच्या वेळी शांत राहून व्यवहार करतात, त्यांच्यात लवचिकता असते. लवचिक व्यक्ती वैयक्तिक संसाधने, सामर्थ्य आणि आशावाद व आत्म-कार्यक्षमता यांसारख्या मानसिक शिदोरीच्या बळावर इतर सकारात्मक क्षमतांचा वापर करून आव्हान स्वीकारतात. लवचिक लोक तणावपूर्ण घटनांशी लढतात. त्या अनुभवांमधून स्वतःला बाहेर खेचतात आणि त्यातून विकसित होतात. लवचिकतेची अनेक नावे आहेत: धीटपणा, कणखरपणा, चिकाटी, दृढता, धीर, धैर्य आणि सामर्थ्य. मानसशास्त्रज्ञ या शब्दाचं स्पष्टीकरण संकटे आणि दुर्दैवातून बरे होण्याची मानवी क्षमता म्हणून करतात. ‘मिनेसोटा कॉलेज ऑफ एज्युकेशन अ‍ॅण्ड ह्युमन डेव्हलपमेंट’ विद्यापीठातील प्राध्यापक मास्टेन यांच्या मते, “लवचिकता हे चेतना देणारे कार्य आहे. व्यवहार्यता किंवा चैत्यन्य निर्माण करताना येणार्‍या अडथळ्यांशी यशस्वीपणे जुळवून घेण्याची प्रेरणादायी क्षमता आहे.” लवचिकता ही जन्मजात गुणवत्ता नाही. फक्त आपल्यापैकी काही जण जन्माला येताना थोडी जास्त ऊर्जा घेऊन येतात. आपल्या सर्वांमध्ये काही जास्त आणि काही कमी प्रमाणात लवचिकता आहे.

सकारात्मक मानसशास्त्रातील लवचिकतेचा अर्थ काय, ते समजून घेऊया.

सकारात्मक मानसशास्त्रात, लवचिकता म्हणजे क्षमता. प्रतिकूल परिस्थितीत आणि कठीण काळात धैर्याने सामोरे जाणे, प्रतिकार आणि सामना करण्यासाठी उपलब्ध शक्ती आणि संसाधने वापरणे, क्लेशदायी घटना आणि कठीण अनुभवातून पुन्हा एकदा पराजणे. लवचिक लोक त्यांच्या प्रतिकूल अनुभवांमध्ये वारंवार एक अर्थपूर्ण उद्देश शोधतात आणि त्यातून अधिक सक्षम होतात. जर्मन तत्वज्ञानी नित्शे यांना याबद्दल माहिती होती आणि ते म्हणाले, “जे मला मारू नाही शकत, ते मला कणखर बनवतं.” (What does not kill me makes me stronger.) आपण सर्वजण अधिकाधिक लवचिक होण्यास शिकू शकतो. परंतु, जेव्हा व्यक्ती आपण लवचिकता निर्माण करू शकत नाही, या दृष्टिकोनाचा स्वतःहून स्वीकार करतात, तेव्हा ते असुरक्षितत होतात आणि पराभव स्वीकारण्यास अधिक प्रवण बनतात. आपल्या नकारात्मक भावना जाणवणे आणि व्यक्त करणे, हे आपल्या मानसिक शक्तीचे लक्षण आहे आणि त्यामुळे त्यांच्याविरूद्ध आपली लवचिकता वाढत जाते.
 
लवचिकता असणे महत्त्वाचे का आहे? व्यक्तीसाठी परत ‘बाऊन्स’ करणे महत्त्वाचे का आहे? लवचिकता महत्त्वाची आहे. कारण, ती आपल्याला प्रतिकार करण्याची आणि अडचणींवर मात करण्याची शक्ती देते. लवचिकता विकसित केल्याने तुम्हाला अनुकूलतेने सामना करण्यास आणि बदल, आव्हाने, अडथळे, निराशा आणि अपयशानंतरसुद्धा सक्षमतेने परत येण्यास मदत होऊ शकते. संशोधनाने दर्शविले आहे की, लवचिकता खूपच सामान्य आहे. लोक तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त वेळा लवचिकता दाखवतात. दि. ११ सप्टेंबर, २००१च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक अमेरिकन लोकांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यांचे जीवन पुन्हा उभारण्यासाठी लोकांनी केलेले अथक प्रयत्न, हे लवचिकतेचे एक उदाहरण आहे. लवचिकता विकसित केल्याने तुम्हाला अनुकूलतेने सामना करण्यास आणि बदल, आव्हाने, अडथळे, निराशा आणि अपयशानंतरसुद्धा सक्षमतेने परत येण्यास मदत होऊ शकते. लवचिकता दर्शविण्याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला एखाद्या कठीण प्रसंगामुळे क्लेश किंवा त्रास झाला नाही. याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही भावनिक वेदना किंवा दुःख अनुभवले नाही.

लवचिकतेचा मार्ग नेहमीच भावनिक दबाव आणि ओढाताणीतून विकसित होत जातो. जेव्हा लवचिकतेची संकल्पना समजण्याचा प्रश्न येतो, तेव्हा ती एक जटिल कल्पना आहे. वास्तविकतेत, जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये लवचिकता भिन्न स्वरूपात आणि भिन्न प्रमाणात अस्तित्वात असण्याची शक्यता जास्त असते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती कामाच्या ठिकाणी खूप लवचिक असू शकते. परंतु, त्याच्या वैयक्तिक जीवनात आणि वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये ती तितकी लवचिक नसते. दुसर्‍या शब्दांत, लवचिकतेची कल्पना सापेक्ष आहे आणि ती परिस्थितीवर अवलंबून असते. आघात किंवा तणावाच्या नकारात्मक परिणामांवर सतत लक्ष केंद्रित करण्याऐवजी किंवा परीक्षण करण्याऐवजी लवचिकता वाढविण्यासाठी शिक्षण पद्धतींवर लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व चिकित्सक आणि संशोधकांना आज जाणवू लागले आहे. तुमच्या परस्पर संवादावर आणि तुमच्या सभोवतालच्या वातावरणानुसार वेळोवेळी लवचिकतादेखील बदलू शकते.

लवचिकतेची कौशल्ये विकसित केल्याने तुम्हाला जीवनातील आव्हाने आणि अडचणींचा सामना करण्यास मदत होऊ शकते, जे तुम्हाला चांगले जगण्यास आणि संकटांचा सामना चांगल्या प्रकारे करण्यास मदत करू शकते. थोडक्यात, लवचिकता आपल्याला तणाव अधिक सकारात्मकपणे हाताळण्यास मदत करते. जीवनातील प्रत्येक गोष्ट समतोल आहे. अंधार नसेल, तर प्रकाशाचे कौतुक होणार नाही. दुःखाशिवाय,आपण आनंदाची प्रशंसा करणार नाही. ‘यिन’ आणि ‘यांग’ प्रमाणेच, तुमच्याकडे जे आहे, त्याचे कौतुक करण्यासाठी तुम्हाला सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही भावना आणि अनुभव आवश्यक आहेत. जीवन नेहमीच सुलभ नसते - परंतु ते नेहमीच अवघड नसावे.

तुम्ही ज्या गोष्टीचा विरोध करता, त्या टिकून राहतात. त्यामुळे अवतीभोवती होणारे बदल आणि प्रतिकूल परिस्थितीशी कसे जुळवून घ्यायचे, हे शिकणे तुम्हाला नवीन सुदृढ मानसिकतेत जाण्यास आणि धोपट मार्गात अधिक लवचिकता विकसित करण्यास मदत करू शकते. गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याची प्रवृत्ती असणे स्वाभाविक आहे. जीवनात अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुम्ही नियंत्रित करू शकता. परंतु, अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुम्ही करू शकत नाही. लवचिकता विकसित करणे ही एक अतिशय वैयक्तिक प्रक्रिया आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण तणाव आणि आघातांवर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतो. काही लोक पटकन स्थिरस्थावर होतात, तर काहींना जास्त वेळ लागतो. यात कोणतेही जादूचे सूत्र नाही.(क्रमश:)

डॉ. शुभांगी पारकर


अग्रलेख
जरुर वाचा
एक डेपो, चार मेट्रो मार्गिका : मोघरपाडा येथे सर्वात मोठ्या एकात्मिक मेट्रो डेपोसाठी एमएमआरडीएला जमीन हस्तांतरित ; एमएमआरडीएने मोघरपाडा मेट्रो डेपोकरीता १७४ हेक्टर भूखंड केला संपादित; मेट्रो मार्गिका ४, ४ए, १० व ११ चे संचालन येथून होणार

एक डेपो, चार मेट्रो मार्गिका : मोघरपाडा येथे सर्वात मोठ्या एकात्मिक मेट्रो डेपोसाठी एमएमआरडीएला जमीन हस्तांतरित ; एमएमआरडीएने मोघरपाडा मेट्रो डेपोकरीता १७४ हेक्टर भूखंड केला संपादित; मेट्रो मार्गिका ४, ४ए, १० व ११ चे संचालन येथून होणार

सन्माननीय मुख्यमंत्री, श्री. देवेंद्र फडणवीस आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष, श्री. एकनाथ शिंदे यांच्या द्रष्ट्या नेतृत्वांतर्गत, तसेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे एकूण १७४.०१ हेक्टर क्षेत्रफळ जमीन अधिकृतपणे ताब्यात घेतली आहे. या जागेवर जागतिक दर्जाचा, एकात्मिक मेट्रो कार डेपो उभारण्यात येणार आहे. हा डेपो मेट्रो ४, ४ए, १० आणि ११ या मार्गिकांसाठी एक केंद्रीय ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121