नवी दिल्ली : पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तानातील गुलमीर कोट भागात झालेल्या बॉम्बस्फोटात ११ कामगारांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले आहेत. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर वझिरीस्तानमध्ये एका व्हॅनमध्ये बॉम्बस्फोट झाला असून दहशतवाद्यांनी मजुरांना घेऊन जाणारे वाहन स्फोटकांनी उडवले.
पोलिस उपायुक्त रेहान गुल खटक यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी मजुरांना घेऊन जाणारे वाहन स्फोटकांनी उडवले असून या स्फोटात ११ कामगारांचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटात जखमी झालेल्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, पाकिस्तानात गेल्या काही महिन्यांत बाँम्बस्फोटाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
दरम्यान, याआधी बाजौरमध्ये आत्मघातकी स्फोट झाला होता. याआत्मघातकी स्फोटात २३ मुलांसह किमान ६३ लोक ठार झाले आणि २०० हून अधिक जखमी झाले होते. अल जझिराने दिलेल्या माहितीनुसार, इस्लामिक स्टेट या गटाने बाजौरमधील बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली असून पाकिस्तानच्या सीमावर्ती जिल्ह्यातील बाजौरमध्ये एका निवडणूक रॅलीला लक्ष्य करण्यात आले.