‘गदर २’ चित्रपटाची हॅट्रीक, पाच दिवसांत कमावले २२८.९८ कोटी

    16-Aug-2023
Total Views |

gadar 2
 
 
 
मुंबई : अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या ‘गदर २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणाऱा चित्रपट म्हणून मान मिळवला आहे. 'गदर २' या चित्रपटाने पाचव्या दिवशी ५५.४० कोटींची कमाई केली आहे.
 
पहिल्या दिवशी चित्रपटाने ४०.१० कोटी, दुसऱ्या दिवशी ४३.०८, तिसऱ्या दिवशी ५१.७० कोटी तर पाचव्या दिवशी ५५.४० कोटींचा व्यवसाय करत ‘गदर २’ने पाच दिवसांची एकूण बॉक्स ऑफिसवरील कमाई २२८.९८ कोटी इतकी केली आहे. अनेक हिंदी चित्रपटांचा रेकॉर्ड गदर २ चित्रपटाने मोडून काढला आहे.
 
 
सनी देओलचा ‘गदर २’ हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. २२ वर्षांपूर्वी आलेल्या ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर ७६.६५ कोटींची रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली होती.