‘गदर २’ चित्रपटाची अवघ्या तीन दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई!

    14-Aug-2023
Total Views | 64
 
gadar 2
 
 
 
 
 
मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या दोन हिंदी चित्रपटांचा सध्या बोलबाला सुरु आहे. ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘गदर – एक प्रेम कथा’ या चित्रपटाने २२ वर्षांपुर्वी इतिहास रचला होता. याच इतिहासाची पुनरावृत्ती ‘गदर २’ या चित्रपटाने केली असून केवळ ३ दिवसांतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.
 
‘गदर २’ चित्रपट ११ ऑगस्ट रोजी देशभरात प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ४०.१० कोटींची कमाई केली. यानंतर दुसऱ्या दिवशी ४३.०८ आणि तिसऱ्या दिवशी ५१.७० कोटी कमावत या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत १३४.८८ कोटींची बॉक्स ऑफिसवर कमाई करत नवा विक्रम केला आहे. या चित्रपटाने 'पठाण' आणि 'बाहुबली' या चित्रपटांचाही विक्रम मोडला आहे. भारतात १३४.८८ कोटींची कमाई करणाऱ्या सनी देओलच्या 'गदर २' चित्रपटाने जगभरात एकूण १०८.२ कोटींचा गल्ला जमवला असून यात अधिक भर होईल असे दिसून येत आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ चित्रपटामध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल यांनी तारा सिंग आणि सकीनाची भुमिका साकारली असून उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
इराणचा इस्रायलवर पलटवार! तेल अवीव, जेरुसलेमसह अनेक शहरांवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे

इराणचा इस्रायलवर पलटवार! तेल अवीव, जेरुसलेमसह अनेक शहरांवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे

(Iran Strikes 150 Missiles on Israel) इस्रायलने शुक्रवारी दि. १३ जून रोजी पहाटे इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर रात्री इराणनेही इस्रायलवर मोठा हल्ला करत चोख प्रत्युत्तर दिले आहे. इराणने या हल्ल्यात इस्रायलमधील अनेक शहरांवर शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. इराणने या प्रत्युत्तरात्मक कारवाईला 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3' असे नाव दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने तेल अवीव व जेरुसलेम या दोन मोठ्या शहरांना लक्ष्य करण्यात आले आहे. इराणी लष्कराने इस्रायलवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याचे वृत्त इस्रायलमधील एका वृत्तप..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121