परदेशात टेस्लाची एस,एक्स मॉडेल लॉन्च
15-Aug-2023
Total Views |
परदेशात टेस्लाची एस,एक्स मॉडेल लॉन्च
नवी दिल्ली - इलॉन मस्क संचलित टेसलाने नवीन फ्लॅगशिप एस,एक्स मॉडेल नुकतीच लॉन्च केली आहेत. १०००० डॉलरने किंमतीत कपात करून ही नवी कार मॉडेल अमेरिका आणि कॅनडातील बाजारात आणली आहेत.
कार उत्पादनात विशेषतः प्रिमियम सेंगमेट मध्ये वाढलेल्या स्पर्धातून फीचर आणि किंमतीमध्ये यंदा चढाओढ पाहायला मिळाली. टेस्ला चा संकेतस्थळावरील अधिकृत किंमतीनुसार एस ची किंमत ७८४९० डॉलर ठेवली गेली आहे.
आम्ही उत्पादनखर्च नियंत्रित करून नव्याने उत्तम दर्जाची आधुनिक भविष्यात उपलब्ध करून देऊ असे टेस्ला तर्फे सांगण्यात आले.