ऑस्ट्रेलियात रिन्यूएबल एनर्जीसाठी रिलायन्स आणि ब्रूकबिल्ड कंपनीमध्ये सामंजस्य करार
नवी दिल्ली: सध्या भारतात व जगात नेट झिरो चे महत्व वाढले आहे.ग्रीन रिन्यूएबल एनर्जीचा सक्षमीकरणासाठी सरकार केंद्रीय पातळांवर एनर्जी क्षेत्रात प्रोत्साहन देत आहे.याच धरतीवर रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ब्रूकफील्ड असेट मॅनेजमेंट कंपनी यांनी सामंजस्य करार (मेमोरेंडम ऑफ अंडरस्टैडिंग)केला आहे.ऑस्ट्रेलिया येथील रिन्यूएबल एनर्जी निर्मितीसाठी लागणारी उपकरणे बनवण्यासाठी या उद्देशाने कराराची पूर्तता करण्यात आली आहे.
कराराचा तरतूदीनुसार वित्तीय पाठिंबा,कौशल्य विकास,तंत्रज्ञानाचे अपग्रेडेशन,उपकरणे बनवण्यासाठी तज्ञांच्या सल्ला या मुद्यावर विचारविनिमय झाला असल्याचे कळते.ब्रूकफील्ड कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा सहाय्याने ऑस्ट्रेलिया येथे भविष्यात 'नेट झिरो 'गाठण्यासाठी आर्थिक गुंतवणूक करणार आहे.ऑस्ट्रेलिया मधील रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात परिवर्तनासाठी या दोन्ही कंपन्या पुढाकार घेणार आहेत. गेल्या दशकात कार्बन इमिशन कमी करून ग्रीन रिन्यूएबल एनर्जी निर्मितीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रयत्न चालू आहेत.
पर्यावरणाला घातक अशा सीओटू इमिशन मुळे अनेक आरोग्य,पर्यावरणाचा समस्या निर्माण होतात.ग्रीन एनर्जी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी हा निर्णया घेतला गेला आहे.या गुंतवणूकीतून आवश्यक ती संसाधने,उपकरण निर्मितीसाठी हा निधी खर्च केला जाईल.१४ गिगाव्हॅट पर्यंत रिन्यूएबल एनर्जी उत्पादन आणि संग्रहित करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून दिला जाईल.