Australia

"प्रशिक्षक आणि खेळाडूंमधील..."; ड्रेसिंग रूमच्या वादावर प्रशिक्षक गौतम गंभीरने सोडले मौन

(Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघ सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या या कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यामुळेच सिडनीमध्ये होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी मेलबर्न येथील पराभवाचे पडसाद भारतीय ड्रेसिंग रुममध्ये उमटल्याच्या चर्चा होत्या. मेलबर्न पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने भारतीय खेळाडूंना फटकारल्याचे वृत्त माध्यमांमधून समोर येत होते. परंतु गंभीरने ड्रेसिंग रुममधील या

Read More

रोहित शर्मा करणार निवृत्तीची घोषणा? सत्य काय?

(Rohit Sharma) मेलबर्न कसोटी सामन्यातील भारताच्या पराभवानंतर आता क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर रोहित शर्माच्या निवृत्तीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता सिडनीमध्ये खेळला जाणारा पाचव्या कसोटी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असल्याचे बोलले जात आ

Read More

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण, कौशल्य विकास आणि पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढणार!

ऑस्ट्रेलिया हा भारताचा अतिशय विश्वसनीय भागीदार असून, आगामी काळात व्यापाराशिवाय उच्च शिक्षण, कौशल्य विकास, चित्रपट सहनिर्मिती, कला व संस्कृती तसेच पर्यटन वाढविण्याबद्दल कसोशीने प्रयत्न करणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत पॉल मर्फी यांनी शुक्रवार, दि. २२ मार्च रोजी दिली.पॉल मर्फी यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ऑस्ट्रेलियात जवळपास १० लाख भारतीय लोक राहत असून ते तेथील अर्थकारण, समाजकारण, क्रिकेट तसेच सांस्कृतिक क

Read More

पाकिस्तानप्रेमी काश्मीरी विद्यार्थ्यांवर युएपीएअंतर्गत गुन्हा

‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी करणाऱ्या 'शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठा'तील सात विद्यार्थ्यांविरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यांतर्गत (युएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जम्मू-काश्मीरमधील गांदरबल येथील शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सात विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. या काश्मिरी विद्यार्थ्यांवर १९ नोव्हेंबर रोजी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाल्यानंतर जल्लोष करण्याचा आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप

Read More

"तुमचे बालिश मीम्स..." पराभवानंतरही खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे जितेंद्र जोशी

एकदिवसीय विश्वचषकात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यात भारताच्या पदरी निराशा आली. विश्वचषकील प्रत्येक सामना जिंकून अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर झालेला पराभव भारतीय खेळाडूंच्या आणि प्रत्येक भारतीय नागरिकांच्या जिव्हारी लागला आहे. मात्र, अशा स्थितीतही भारतीयांनी खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट समाज माध्यमावर केल्या आहेत. तर काही जणांना दुर्दैवाने कुणी त्यांना वाईट म्हणणारे मीम्स व्हायरल केले आहेत. परंतु, या सगळ्यात अभिनेता जितेंद्र जोशीने केलेल्या खास पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे.

Read More

"भारताने संपुर्ण विश्वचषक स्पर्धा", शाहरुख खानची भारतीय क्रिकेटपटूंसाठी भावनिक पोस्ट

विश्वचषक २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या पदरी पराभव आला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना रंगला होता. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा हा रंजक सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार देथी उपस्थित होते. यात किंग खान शाहरुख खान पत्नी गौरी खान सह सामना पाहण्यासाठी गेला होता. भारताच्या पराभवानंतर चाहते आणि कलाकार जरी निराश झाले असले तरी त्.नी भारतीय क्रिकेटपटूंचे कौतुक केले आहे. यात शाहरुख खान याचाही समावेश आहे.

Read More

भारत-ऑस्ट्रेलियातील अंतिम सामन्यात कोण जिंकणार? रजनीकांत यांनी केली भविष्यवाणी

जगातील सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष सध्या १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भारत- ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या विश्वचषक अंतिम सामन्याकडे लागले आहे. एकदिवसीय विश्वचषक सामन्यात भारत-ऑस्ट्रेलियाचा सामना अहमदाबाद येथे रंगणार असून स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हा सामना पाहण्यासाठी हजर राहणार आहेत. १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या उपांत्य फेरीसाठी भारताला प्रोत्साहन देण्यासाठी कलाकारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत देखील होते. आता रजनीकांत यांनी १९ नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्याची भविष्य

Read More

"ऑस्ट्रेलियाबरोबर २००३ चा बदला घ्या", सिद्धार्थ चांदेकरने दिला भारतीय संघाला सल्ला

एकदिवसीय विश्वचषकच्या अंतिम सामन्याकडे सध्या संपुर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात चुरशीची लढत १९ नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे. अहमदाबादयेथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपसाठीचा थरार पाहायला मिळणार आहे. अनेक कलाकारांसोबत अभिनेता सिद्धार्थ जाधव देखील क्रिकेटप्रेमी आहे. आणि भारत-ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याबद्दल त्याने रेडिओ मिरचीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे. सिद्धार्थने यावेळी भारतीय क्रिकेट संघाला एक सल्ला दिला आहे. तो म्हणाला, "माझी इच्छा आहे की त्या ऑस्ट्रेलियाची अशी

Read More

ड्रग्जमाफियांचा कर्दनकाळ ठरणार देवेंद्र फडणवीसांचं गृहमंत्रालय!

एका पोलीस अधिकार्‍याची इयत्ता आठवीत शिकणारी मुलगी. एकेदिवशी अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र दवाखान्यात उपचार सुरू करण्याआधीच त्या १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.मात्र, तिचा शवविच्छेदन अहवाल मिळाला आणि तिच्या पोलीस अधिकारी असलेल्या पित्याला आणि कुटुंबाला काय करावे हे सुचेनासे झाले. कारण, शवविच्छेदन अहवालात लिहिले होते की, अंमली पदार्थाच्या प्रमाणाबाहरे सेवन केल्याने तिच्या मेंदूच्या नसा फुटल्या होत्या. तसेच त्या अल्पवयीन मुलीवर अनेकदा क्रूर लैंगिक अत्याचार झाला होता. ही घटना

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121