मुंबई : भारतात सध्या समान नागरी कायदा आणण्याची चर्चा सुरु आहे. पण समान नागरी कायद्याला भारतातील काही कट्टरपंथीय लोक विरोध करत आहे. भारतात मुस्लीम पर्सनल लॉमध्ये चार निकाह म्हणजेच लग्न करायला परवानगी आहे. मुस्लीम पर्सनल लॉनूसार कोणताही मुस्लीम पुरुष चार लग्न करु शकतो. महिलांना ही परवानगी नाही. सोबतच २०१९ च्याआधी ट्रिपल तलाकही भारतात कायदेशीर होता.
यातच आता पाकिस्तानमधील एक व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हीडिओत पत्रकार एका व्यक्तीची मुलाखत घेत आहे. या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार त्यांने आतापर्यंत २६ लग्न केली आहेत. यातील २२ बायकांना त्याने तलाकही दिला आहे. सोबतच आता त्याच्या सोबत सध्या ४ बायका आहेत.
यांनाही तो पुढे चालून तलाक देणार आहे, असं तो जाहीरपणे सांगतोय. या चार बायकांमधील सर्वात मोठ्या बायकोच वय अवघं १९ वर्ष आहे. बाकीच्या मुली तिच्यापेक्षाही कमी वयाच्या आहेत. सोडलेल्या महिलांना प्रत्येकी एक-एक मुलगाही आहे, असही तो सांगत आहे.
हा व्हीडिओपाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. लोकं त्या लहान मुलींविषयी सहानभूती व्यक्त करत आहेत. पाकिस्तानमध्ये ट्रिपल तलाकला कायद्याने बंदी आहे. तरीही पाकिस्तानमध्ये बाकी कायद्याप्रमाणेच या कायद्याचेही पालन होत नाही.