नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सामान्य नाहीत. परंतु तरीही परंपरेचे पालन करून, सीमा सुरक्षा दल (BSF) आणि पंजाबमधील पाकिस्तान रेंजर्सनी ईदच्या निमित्त अटारी-वाघा सीमेवर एकमेंकाना मिठाईची भेट दिली. ईदच्या निमित्त बीएसएफच्या १७६ बटालियनने फुलबारी भारत-बांगलादेश सीमेवर आपल्या १८ बॉर्डर गार्डिंग फोर्स (बीजीबी) च्या समकक्षांसोबत मिठाईची भेट दिली. दरम्यान दोन्ही देशांमध्ये ईदचा सण उत्साहात साजरा केला जात आहे.