"दामाद है वो पाकिस्तान का! उसे नारियल दो , टीका लगाओ , वरना इसबार वो दहेज में लाहौर ले जाएगा!"

    12-Jun-2023
Total Views |
Upcoming Movie Gadar 2 Teaser Released
 
मुंबई : 'गदर २' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २००१ साली आलेल्या 'गदर' या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात दाखविलेला हात पंप उखडल्याचा सीन प्रचंड गाजला होता. पण या दुसऱ्या भागामध्ये अभिनेता सनी देओलच्या हातात हात पंपाऐवजी बैलगाडीचे चाक असल्याचे दिसते आहे. तसेच या चित्रपटाचा एक डायलॉग जो सध्या प्रचंड गाजतोय तो म्हणजे "दामाद है वो पाकिस्तान का! उसे नारियल दो , टीका लगाओ , वरना इसबार वो दहेज में लाहौर ले जाएगा!" हा डायलॉग महिलेच्या आवाजात असून हा चित्रपट ११ ऑगस्ट प्रदर्शित होऊन प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहता येणार आहे.