कराची : पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर हल्ल्यांचे प्रमाण सातत्याने वाढत असून, त्यांची धार्मिक स्थळे देखील लक्ष्य केली जात आहेत. विशेष करुन हिंदु मंदिरांवर होणार्या हल्ल्यांचे प्रमाण वर्षभरात दुप्पट झाले आहे, असा निष्कर्ष पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने आपल्या अहवालात काढला आहे.
पाकिस्तानात धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थितीवर यात तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ए ब्रीच ऑफ फेथ : फ्रीडम ऑफ रिलिजन ऑर बिलीफ २०२१-२२ शीर्षकाचा हा अहवाल आहे. त्यानुसार, अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार व भेदभाव सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक प्रचंड दहशतीखाली आहेत. या घटनांमुळे सरकारची धार्मिक स्वातंत्र्याची चर्चा पोकळ असल्याचे दिसून येते, असेही या अहवालात म्हटले आहे.
- सिंधमधील हिंदू मुलींचे सातत्याने होणारे धर्मांतर चिंताजनक आहे.
- अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळांची विटंबना आणि तोडफोड
- स्वायत्त अल्पसंख्याक आयोग स्थापण्याची गरज
- सक्तीच्या धर्मांतरास गुन्हा ठरवण्याचा कायदा
देशातील अल्पसंख्याकांसोबत भेदभाव होऊ नये. त्यांना त्यांचे जीवन मुक्तपणे जगता आले पाहिजे. त्यांनी दहशतीत राहू नये. त्यांच्या धार्मिक स्थळांचे संरक्षण झाले पहिजे.-डॉ. खाटमल जीवन, सिंध विधानसभा सदस्य
अलीकडच्या काळात प्रगतीचे काही संकेत मिळत असतानाही, देशात धार्मिक भेदभाव मोठ्या प्रमाणावर आहे. राजकीय सहभाग, विवाह, धार्मिक श्रद्धा यासह प्रत्येक क्षेत्रात भेदभाव होत आहे. हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी कायदेशीर तरतूद करण्याची गरज आहे.
-फरजाना बारी, मानवाधिकार कार्यकर्त्या
सक्तीच्या धर्मांतरासह हत्या वाढल्या
सिंध प्रांतात टार्गेट किलिंग, बलात्कार, हिंदूंची जमीन बळकावणे, सामूहिक धर्मांतर, घरे आणि मंदिरे जाळणे, स्मशानभूमीवरील हल्ले या घटना सर्रास घडत आहेत. अलीकडेच डॉ.बिरबल गेनानी यांची कराचीतील घरी परतत असताना हत्या झाली. अशी माहिती हिंदूंच्या हक्कांसाठी लढणारी संघटना पाकिस्तान दरार इतेहाद (पीडीआय)ने दिली आहे.
हिंदूंविरुद्ध गुन्हे
सक्तीचे धर्मांतर ३४
जखमी अवस्थेत मृतदेह ३७
कार्यक्रम २०२१
टार्गेट किलिंग १७
सक्तीचे धर्मांतर २८
जखमी अवस्थेत मृतदेह २१
मंदिरांमध्ये तोडफोड ३६