लाहोर : पाकिस्तानचे पोलिस रविवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घरी पोहोचले. तोशाखाना (सरकारी खजिना घोटाळा) प्रकरणात आरोप असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस त्यांच्या घरी पोहोचले, त्याआधीच इम्रान खान घरातून फरार झाले. त्यामुळे पोलिसांना रिकाम्या हातानेच परत यावे लागले. इमरान यांना केव्हाही अटक होऊ शकते. त्यामुळे ते गायब झाल्याचे म्हटले जात आहे.