मुंबई : पवई 'आयआयटी'मधील विद्यार्थी दर्शन सोळंकी यांच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी व्हावी. तसेच पुन्हा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना पुन्हा घडू नयेत या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आंदोलन करण्यात येणार आहे. दि. २० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पवई आयआयटीच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर शांतातपूर्ण आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रिपाइं चे मुंबई कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड, पवई विभागीय नेते बाळ गरुड, विनोद लिपचा आणि भाऊ पंडागळे यांनी दिली आहे.
पवई आयआयटीमधील विद्यार्थी दर्शन सोळंकी यांची आणि यापूर्वी २०१४ मध्ये अंभोरे या विद्यार्थ्यांची आत्महत्या झाली आहे. विद्यर्थ्यांची आत्महत्या होण्यामागे जातीभेद आणि रॅगिंगचा प्रकार आहे का याचा सखोल तपास करण्यात यावा अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे.आत्महत्या केलेला विद्यार्थी दर्शन सोळंकीच्या बहिणीनेही तिचा भाऊ दर्शन सोळंकी आत्महत्या करू शकत नाही, असा दावा केला आहे. त्यामुळे दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याच्या आत्महत्येची चौकशी व्हावी या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे आंदोलन केले जाणार आहे.