दम असेल तर सावरकरांची प्रतिमा काढून दाखवा; प्रमोद मुतालिक यांची खर्गेंविरोधात आक्रमक भुमिका!

    09-Dec-2023
Total Views |
Pramod Mutalik on Priyank Kharge

नवी दिल्ली
: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे मंत्री पुत्र प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा कर्नाटक विधानसभेतून हटविण्याचे वक्तव्य केल्याबद्दल आता श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. दम असेल तर सावरकरांचा फोटो काढून दाखवा, असे आव्हान प्रमोद मुतालिक यांनी दिले आहे.तसेच सावरकरांची प्रतिमा हटवल्यास संपुर्ण राज्यात आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. हे विधान त्यांनी दि.८ डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केले.
 
दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाचे पडसाद दि. ८ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात उमटले. वीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारकर वक्तव्य करणाऱ्या कर्नाटकच्या मंत्र्याविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
 
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पूत्र प्रियांक खर्गे यांनी नुकतेच वीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. 'मी विधानसभेचे अध्यक्ष असतो, तर बेळगाव येथील विधानसभेतून सावरकरांचा फोटो काढून टाकला असता. सावरकर यांचे योगदान काय? सावरकर यांना वीर ही पदवी कशी मिळाली? ज्यांची विचारधारा द्वेष आणि फूट पाडत असेल, त्यांचा फोटो नको. त्यामुळे सावरकरांचे चित्र विधानसभेत नसावे', असे वक्तव्य खर्गे यांनी केले होते. ज्याला आता सर्व स्तरातून विरोधल होत आहे.