काँग्रेस उबाठा गटाला केवळ ५ जागा सोडणार - नितेश राणे
29-Dec-2023
Total Views |
मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी काँग्रेस उबाठा गटाला फक्त पाच जागा सोडतील अस म्हटल आहे. महाएमटीबीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे २३ जागा मागत आहेत पण त्यांच्याकडे २३ माणसं राहीली आहेत का असही ते म्हणाले.
"उद्धव ठाकरे जेव्हा युती मध्ये होते तेव्हा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर यायचे तेव्हा उद्धव ठाकरे चर्चेतून उठुन जायचे आणि आदित्य ठाकरेंना पुढे कारायचे. आता काँग्रेसचे सोनिया गांधी, राहूल गांधी त्यांना विचारतही नाहीत. त्यामुळे काँग्रेस त्यांना जागा देणार नाही". असही ते म्हणाले.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे पण तुम्हाला वेळ देतील अस वाटत नाही त्यामुळे २३ जागा मागण्यापेक्षा काँग्रेस देतील त्या ५ जागा घ्या आणि निवडणुकीला सामोरे जा असा सल्लाही त्यांनी उद्धव ठाकरेंना यावेळी दिला.