मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीच्या माध्यमातून महाराष्ट्र अन्न व औषध विभाग प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ अंतर्गत ही पदे भरली जाणार आहेत.
एमपीएससी अंतर्गत भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून दि. ०७ नोव्हेंबर २०२३ पासून अर्ज स्वीकृतीस सुरुवात झाली असून अंतिम मुदत दि. २१ नोव्हेंबर २०२३ असणार आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन संवर्गातील २०२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
सदर भरतीकरिता अर्जदारास शुल्क आकारण्यात येणार असून खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५४४ रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३४४ रुपये अर्जशुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच, भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.