मुंबई: २०२३ मध्ये भारतातील सर्वात मोठे परोपकारी होण्याचा मान एचसीएल टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष शिव नाडर यांनी मिळवला आहे. एडेलगिव्ह हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी लिस्ट २०२३च्या अहवालानुसार शिव नाडार यांनी २०२३ या मध्ये २०४२ कोटींची देणगी दिली आहे. जी मागील वर्षाच्या तुलनेत ७६ टक्के जास्त आहे. शिव नाडर हे मागच्या वर्षी देखील भारतातील सर्वात मोठे परोपकारी व्यक्ती होते.
या वर्षीच्या एडेलगिव्ह हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी लिस्ट २०२३च्या यादीनुसार, विप्रोचे अझीम प्रेमजी हे परोपकारी लोकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी २०२३ मध्ये १७७४ कोटी रुपये दान केले. त्यांच्यासोबतच मुकेश अंबानी यांनी २०२३ मध्ये ३७६ कोटी रुपयांची देणगी दिली. तर गौतम अदानी यांनी सुद्धा २८५ कोटींची देणगी दिली. तर आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी २८७ कोटी रुपयांच्या देणगी दिली आहे.
भारतातील परोपकारी महिलांच्या यादीत रोहिणी नीलेकणी यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. त्यासोबतच बजाज कुटुंबाने आणि पूनावाला कुटुंबाने सुद्धा या यादीत स्थान मिळवले आहे. २०२२ च्या तुलनेत या वर्षी भारतातील अब्जाधीशांनी ५९ टक्के अधिक देणगी दिली आहे. यावर्षी १४ भारतीयांनी १०० कोटी पेक्षा अधिक दान दिले. तर गेल्यावर्षी फक्त ६ लोकांनी १०० कोटींपेक्षा अधिक दान दिले होते.