शेअर मार्केट अपडेट्स: पॅलेस्टाईन हमास घटनेचे शेअर बाजारात सावट. रुपयाचे अवमूल्यन होताना सेन्सेक्स निफ्टी पण नकारात्मक
क्लोजिंग बेलनंतर निफ्टी १९५१२.३० व सेन्सेक्स ६५५१२ वर थांबला
मुंबई: पॅलेस्टाईन व इस्त्रायली देशात हिंसाचार झाल्याने जगात तंगीचे वातावरण दिसले. हमासने गाझा पट्टीत केलेल्या हल्ल्यामुळे अनेक इस्त्रायली नागरिक ठार व जखमी झाले. त्यांचे प्रत्युत्तर देण्यासाठी इस्त्राईलने युद्ध जाहीर केले आहे. अर्थविश्वात या विषयावर विविध मान्यवरांनी आपले मत मांडले आहे. या घटनेनंतर विशेषतः क्रूड इंधन दरात भाववाढीची चिंता आता व्यक्त होऊ लागली असतानाच त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसला.
भारतीय रूपया डॉलरच्या तुलनेत गडगडून कमीण कमी उच्चांकाची नोंद केली. तब्बल ८३ रुपये प्रति डॉलरचा भाव सकाळी ट्रेडिंग आवर्स मध्ये होता. क्लोजिंग बेलनंतर निफ्टी १४१.२० पूर्णांकांने कमी होऊ १९५१२.३० वर आला व सेन्सेक्स इंडेक्स ४८३.२४ पूर्णांकांने कमी होत ६५५१२ वर आले आहे. शुगर स्टॉकचे आज नुकसान दिसून आले. त्यामध्ये उगर शुगर वर्क्स, केसीफी शुगर व इंडस्ट्रीज, सकथी शुगर, राजश्री शुगर अशा शेअर्सचे आज नुकसान बघायला मिळाले.
सकाळी ओपनिंग बेलनंतर निफ्टी ५० १९५५६. ९० वर, बीएसी सेन्सेक्स इंडेक्स ४३५ पूर्णांकांने कमी होऊन ६५५६० पर्यंत आला आहे. निफ्टी मध्ये अदानी पोर्टस, हिरो मोटोकॉर्प, एचडीएफसी लाईफ हे लूजर ठरले असून एचसीएल टेक्नॉलॉजी, डॉ रेड्डी, टीसीएस, टाटा कनज्यूमर, एचयुएल हे शेअर्स तेजीत राहीले.